*गणरायाला निरोप देताना सुरक्षितता, शिस्त आणि पर्यावरणाचा संदेश – डॉ. नीलम गोऱ्हे*
पुणे : पुणे शहरातील ऐतिहासिक आणि वैभवशाली गणेश विसर्जन मिरवणुकीचा प्रारंभ आज लोकमान्य टिळक पुतळा, महात्मा फुले मंडई येथून झाला. यावेळी शिवसेना नेत्या आणि विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे उपस्थित होत्या.
गणरायाला निरोप देताना त्यांनी गणेशभक्तांना शुभेच्छा दिल्या आणि पोलिसांनी केलेल्या सुरक्षा व्यवस्थेचे कौतुक केले.
माध्यमांशी बोलताना डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, “आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. विसर्जन मिरवणुकीदरम्यान नागरिकांची, विशेषतः महिलांची सुरक्षितता आणि आरोग्य यासाठी पोलिसांनी चांगली व्यवस्था केली आहे. त्यांचे मी स्वागत करते.”
दरम्यान, दुष्काळ निवारण आणि जलसंधारणाच्या प्रश्नावरही त्यांनी भाष्य केले. केज, लातूर, अहमदपूर, तुळजापूरसह विविध तालुक्यांमध्ये जैवशेती आणि जलसंधारणाचे काम करणाऱ्या संस्थांच्या संपर्कात असून, त्यांच्या अनुभवातून दुष्काळावर शाश्वत उपाय काढण्यासाठी लवकरच बैठक घेऊन शासन स्तरावर पाठपुरावा करणार असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.
*- माई मीडिया २४*
—




















