Home संभाजीनगर *विद्यार्थ्यांचे शैक्षणिक व परीक्षा शुल्क माफ करा – आमदार सतीश चव्हाण*

*विद्यार्थ्यांचे शैक्षणिक व परीक्षा शुल्क माफ करा – आमदार सतीश चव्हाण*

80
0

*विद्यार्थ्यांचे शैक्षणिक व परीक्षा शुल्क माफ करा – आमदार सतीश चव्हाण*

मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक व परीक्षा शुल्क माफ करावे, अशी मागणी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली आहे.

मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, दुष्काळामुळे शेतकरी, शेतमजूर कुटुंबांवर आर्थिक संकट आहे. अनेक कुटुंबांचे उत्पन्न घटले असून दैनंदिन खर्च भागवणे कठीण झाले आहे. याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होण्याची शक्यता आहे.

अभियांत्रिकी, वैद्यकीय, कृषी, फार्मसी, पदवी, पदव्युत्तर आणि व्यावसायिक अभ्यासक्रम शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना शुल्क भरणे अडचणीचे झाले आहे. कोणताही विद्यार्थी आर्थिक अडचणीमुळे उच्च शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी शासनाने तातडीने शुल्क माफ करावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

—

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here