Home मुंबई *ना.गणेश नाईक यांचे आवाहन: १५ सप्टेंबर रोजी वाढदिवसानिमित्त भेटीसाठी उपलब्ध नाही, ‘एक...

*ना.गणेश नाईक यांचे आवाहन: १५ सप्टेंबर रोजी वाढदिवसानिमित्त भेटीसाठी उपलब्ध नाही, ‘एक झाड, एक जबाबदारी’ जपा*

9
0

*ना.गणेश नाईक यांचे आवाहन: १५ सप्टेंबर रोजी वाढदिवसानिमित्त भेटीसाठी उपलब्ध नाही, ‘एक झाड, एक जबाबदारी’ जपा*

*नवी मुंबई, दि. १३ सप्टेंबर २०२६ -* माजी मंत्री आणि ऐरोलीचे आमदार *गणेश नाईक* यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त महत्त्वाचे आवाहन केले आहे.

*१५ सप्टेंबर* रोजी वाढदिवसानिमित्त पूर्वनियोजित महत्त्वाच्या व्यस्ततेमुळे यंदा प्रत्यक्ष शुभेच्छा स्वीकारण्यासाठी उपलब्ध राहता येणार नाही, असे त्यांनी त्यांच्या अधिकृत फेसबुक पोस्टद्वारे कळवले आहे.

*त्यांचे आवाहन:*
“हार, पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ किंवा भेटवस्तू घेऊन प्रत्यक्ष भेटण्याऐवजी *’एक झाड, एक जबाबदारी’* हा संदेश जपत किमान *एक झाड लावावे* आणि त्याच्या संगोपनाची जबाबदारी स्वीकारावी. तसेच आपल्या परिसरात एखादे समाजोपयोगी कार्य करावे.”

“आपल्या शुभेच्छा आणि आशीर्वाद हीच माझ्यासाठी सर्वात मोठी भेट आहे; या शुभेच्छांचे रुपांतर पर्यावरण संवर्धन, सामाजिक बांधिलकी आणि समाजहिताच्या कार्यात झाले तर, त्यापेक्षा मोठा आनंद नाही!” असे गणेश नाईक यांनी म्हटले आहे.

*संपादक: प्रो. शीतल हरीश करदेकर | MAI MEDIA २४*

#MAIMEDIA२४ #GaneshNaik #Airoli #NaviMumbai #OneTreeOneResponsibility #BirthdayAppeal #ProShittalKardekar

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here