Home मुंबई * प्रवाशांच्या सेवेसाठी एसटीचा ताफा अधिक सक्षम – ५,००० लालपरी बसेसची निविदा...

* प्रवाशांच्या सेवेसाठी एसटीचा ताफा अधिक सक्षम – ५,००० लालपरी बसेसची निविदा प्रक्रिया पूर्ण

8
0

*प्रवाशांच्या सेवेसाठी
एसटीचा ताफा होणार
अधिक सक्षम!*

प्रवाशांच्या सेवेसाठी एसटीचा ताफा अधिक सक्षम – ५,००० लालपरी बसेसची निविदा प्रक्रिया पूर्ण

*Slug:* st-mah Mandal-5000-lalpari-bus-tender-pratap-sarnaik
मुंबई, दि. १३ : सर्वसामान्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग असलेल्या एसटीच्या ताफ्याला आधुनिकतेची झळाळी मिळणार आहे. ५,००० ‘लालपरी’ बसेसच्या खरेदीची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून टाटा मोटर्सने सर्वात कमी दराचा देकार दिला आहे, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.

पुढील सहा महिन्यांत ५,००० हून अधिक जुन्या बसेस कालबाह्य होणार आहेत. सध्या १२-१४ वर्षे जुन्या बसेस दुरुस्त करून चालवाव्या लागत आहेत. नव्या बसेसमुळे जुन्या बसेसवरील ताण कमी होईल आणि बंद पडण्याच्या समस्या संपतील.

यापूर्वीच २ बाय २ च्या २,६४० लालपरी आणि ३ बाय २ च्या ३,००० राजमाता जिजाऊ बसेस ताफ्यात दाखल होत आहेत.

‘मागेल त्याला बसफेरी’ हा उपक्रम राबवणार असून, बसफेरी तोट्यात जाणार नाही याची हमी मागणी करणाऱ्यांनी द्यावी, असे आवाहन सरनाईक यांनी केले आहे. हा डिझेल बस युगातील महत्त्वाचा टप्पा असून यानंतर ई-बसेसचा प्रवास वेगाने सुरू होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here