Home मुंबई *तीन पुरस्कारांनी ‘शिंदेंच्या नेतृत्वावर’ आंतरराष्ट्रीय मोहोर; मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष!*

*तीन पुरस्कारांनी ‘शिंदेंच्या नेतृत्वावर’ आंतरराष्ट्रीय मोहोर; मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष!*

7
0

*तीन पुरस्कारांनी ‘शिंदेंच्या नेतृत्वावर’ आंतरराष्ट्रीय मोहोर; मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष!*

Slug: eknath-shinde-london-award-mumbai-airport-welcome

Article Body:
मुंबई, ता. १३ : लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविले गेलेले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबईत परतताच शिवसैनिकांनी विमानतळावर जोरदार शक्तिप्रदर्शन करत स्वागत केले. पहाटे तीन वाजता छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल झालेल्या शिंदेंच्या स्वागतासाठी शिवसैनिक आणि समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तीन दिवसांच्या लंडन दौऱ्यात मिळालेले हे पुरस्कार केवळ वैयक्तिक गौरव नसून महाराष्ट्रातील साडेबारा कोटी जनतेचा सन्मान असल्याचे शिंदे यांनी सांगितले. “हा पुरस्कार माझा नाही, महाराष्ट्राच्या जनतेचा सन्मान आहे,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

लंडनमधील भारतीय आणि मराठी समाजाने केलेल्या स्वागताने भारावून गेल्याचे त्यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत आर्थिक महासत्ता बनण्याच्या दिशेने वाटचाल करत असून, या प्रवासात महाराष्ट्राची भूमिका जगासमोर मांडता आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

लंडनमधील पायाभूत सुविधा, वाहतूक शिस्त आणि हेरिटेज वास्तूंचा अनुभव महाराष्ट्राच्या विकासासाठी उपयुक्त ठरेल, असे ते म्हणाले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वास्तव्याच्या ऐतिहासिक वास्तूला भेट दिल्याचाही त्यांनी उल्लेख केला.

विराट कोहली यांच्या भेटीचा आणि लंडनमध्ये वडापाव खाण्याच्या मिश्कील आठवणीचा किस्साही त्यांनी शेअर केला. “जगाच्या पाठीवर कुठेही गेलात तरी वडापाव मिळतो,” असे ते म्हणाले.

यावेळी आमदार प्रकाश सुर्वे, तुकाराम काते, मुरजी पटेल आणि शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here