Home जालना / परभणी / बीड / लातूर / हिंगोली / नांदेड / उस्मानाबाद *जालना जिल्ह्यात १८,२७६ कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप – ९९.९% अर्ज मंजूर – जिल्हाधिकारी...

*जालना जिल्ह्यात १८,२७६ कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप – ९९.९% अर्ज मंजूर – जिल्हाधिकारी आशिमा मित्तल*

6
0

*जालना जिल्ह्यात १८,२७६ कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप – ९९.९% अर्ज मंजूर – जिल्हाधिकारी आशिमा मित्तल*

*जालना, दि. १० (जिमाका):* कुणबी, कुणबी-मराठा आणि मराठा-कुणबी प्रमाणपत्र वाटपाबाबत जिल्हाधिकारी *आशिमा मित्तल* यांनी पत्रकार परिषदेत मोठी माहिती दिली. शासन सकारात्मक असून मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घ्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

*ठळक आकडेवारी:*

*१. कुणबी नोंदी:* संदीप शिंदे समितीने जालना जिल्ह्यात *५,०२७ नोंदी* शोधल्या. या आधारे *१८,२९५ अर्जांपैकी १८,२७६ अर्ज मंजूर (९९.९%)*. केवळ १९ अर्ज इतर जिल्ह्याचे पुरावे असल्याने नामंजूर. एकही अर्ज प्रलंबित नाही.

*तालुकानिहाय:* भोकरदन – ६,३१८ (सर्वाधिक), अंबड – ३,१८५, परतूर – २,४१८, मंठा – २,०४५, बदनापूर – १,४३६, जालना – १,३४०, जाफ्राबाद – ९९४, घनसावंगी – ५४०.

*२. हैदराबाद गॅझेटनुसार:* २ सप्टेंबर २०२५ च्या GR नुसार ४२१ अर्जांपैकी *३७७ प्रमाणपत्रे वाटप*.

*३. SEBC १०% आरक्षण:* २०२४-२६ मध्ये *३५,९८१ प्रमाणपत्रे* वाटप. (२०२४-१०,०३५, २०२५-१६,१८०, २०२६-९,७६६)

*४. जात पडताळणी:* १,६६४ पैकी १,०१६ वैध, २३ अवैध, १३३ त्रुटींमुळे निकाली. ४९२ प्रलंबित.

*जिल्हा प्रशासनाचे निर्णय:*
– दि. १० ते १७ सप्टेंबर २०२६ – *महसूल मंडळनिहाय विशेष शिबिरे*. आज १२ मंडळात शिबिर – २२ अर्ज प्राप्त.
– *हेल्पलाईन:* उपजिल्हाधिकारी शिरीष यादव नोडल अधिकारी. क्रमांक – *०२४८२-२२३१३२* (स. १० ते सं. ६)
– सर्व नोंद्यांची यादी संकेतस्थळावर आणि ग्रामपंचायतींवर प्रसिद्ध.
– अंतरवाली सराटीच्या शाळा, अंगणवाडी विकासावर विशेष लक्ष. अवैध दारूविरोधात ९ जणांवर कारवाई.

*विद्यार्थ्यांसाठी:*
– डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह भत्ता – *२०० कोटींची* तरतूद.
– परदेशी शिष्यवृत्ती – फी थेट विद्यापीठाला.
– १ ऑक्टोबरपासून *१,४४० युवकांना* रोजगाराभिमुख प्रशिक्षण.

*सविस्तर: http://mai24news.in*

*#Jalna #KunbiCertificate #AshimaMittal #ManojJarangePatil #MarathaReservation #SEBC #HyderabadGazette #AntarwaliSarati #MaiMedia24*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here