*पुण्याच्या सर्वांगीण विकासासाठी पीएमआरडीएचा ‘मास्टर प्लॅन’ गतिमान करा – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांचे निर्देश*
पुणे जिल्ह्याच्या नियोजित व सर्वांगीण विकासामध्ये पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची (PMRDA) भूमिका अत्यंत महत्त्वाची असून, पायाभूत सुविधांची कामे अधिक वेगाने आणि नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण करावीत, असे निर्देश उपमुख्यमंत्री *सुनेत्रा अजित पवार* यांनी आज दिले.
सह्याद्री राज्य अतिथीगृह, मुंबई येथे PMRDA क्षेत्रातील विविध विकासकामांचा आढावा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी घेतला. यावेळी सुरू असलेल्या व प्रस्तावित प्रकल्पांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
या बैठकीस उपमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ. राजेश देशमुख, PMRDA आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, सह आयुक्त रुपाली आवले-डंबे, पूनम मेहता, हिम्मत खराडे, महानगर नियोजनकार स्मिता कलकुटकी, मुख्य अभियंता रिनाज पठाण, शिवप्रसाद बागडी यांच्यासह विभागप्रमुख उपस्थित होते.
*उपमुख्यमंत्र्यांच्या ५ मोठ्या सूचना:*
*१. इनर रिंग रोड आणि कनेक्टिव्हिटीला गती:*
PMRDA कार्यक्षेत्रात ६७४ गावे आणि ५,२१५ चौ. किमी क्षेत्र आहे. वाढती लोकसंख्या, औद्योगिकीकरण आणि पर्यटनाच्या संधी लक्षात घेऊन दीर्घकालीन नियोजन करा. पुणे इनर रिंग रोड, CMP अंतर्गत प्रकल्प, हिंगणगाव पूल, यवत रेल्वे ब्रिज यांना गती द्या. मल्टिमोडल हब, औद्योगिक, धार्मिक स्थळ, पर्यटन आणि विमानतळ कनेक्टिव्हिटीचा एकात्मिक विचार करा.
*२. हिंजवडी वाहतूक कोंडी – मेट्रो लाईन-३:*
माण-हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो लाईन-३ चे काम तातडीने पूर्ण करा. २३ स्थानकांपैकी १२ पूर्ण झाली असून ५ अंतिम टप्प्यात आहेत. उर्वरित कामांना गती देऊन प्रकल्प लवकर सेवेत आणा.
*३. नदी प्रदूषण नियंत्रणाला सर्वोच्च प्राधान्य:*
इंद्रायणी, पवना, मुळा आणि मुठा नद्यांचे प्रदूषण रोखण्याचे प्रकल्प तातडीने मार्गी लावा. केवळ प्रकल्प नको, तर यंत्रणा स्वयंपूर्ण व आर्थिकदृष्ट्या शाश्वत करा, जेणेकरून देखभाल-दुरुस्तीचा खर्च भागेल.
*४. अग्निशमन केंद्रांचे जाळे सक्षम करा:*
वाढत्या नागरीकरणासाठी अग्निसुरक्षा महत्त्वाची. कासार आंबोली येथील अग्निशमन केंद्र प्रगतीपथावर असून आणखी १२ केंद्रे प्रस्तावित आहेत. त्यांना गती द्या.
*५. पिण्याच्या पाण्याचे दीर्घकालीन नियोजन:*
वाढत्या लोकसंख्येसाठी आतापासूनच पाण्याचे नियोजन करा. नवीन जलस्रोत शोधा. नागरी वसाहती, औद्योगिक क्षेत्रे आणि पर्यटनस्थळांसाठी वितरण व्यवस्थेचा एकत्रित विचार करा.
पुण्याचा विकास हा केवळ रस्ते-इमारतींपुरता न राहता वाहतूक, पाणी, पर्यावरण, अग्निसुरक्षा, उद्योग, पर्यटन आणि नागरिकांच्या जीवनमानाचा सर्वंकष विचार करणारा असावा, अशा स्पष्ट सूचना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिल्या.
*वाचा सविस्तर: http://mai24news.in*
*#SunetraPawar #PMRDA #PuneDevelopment #PuneMetro #InnerRingRoad #PuneNews #MaiMedia24*
—




















