*लंडनच्या संसदेत भारतीय संविधानाचा जागर – मुंबईत पत्रकार परिषदेत मोठी घोषणा*
मुंबई मराठी पत्रकार संघात आज झालेल्या पत्रकार परिषदेत व्यासपीठावर (डावीकडून) होलीडे हॉस्पिटलच्या डॉ. शीतल देधिया, BBMG फाउंडेशनचे पदाधिकारी, अभिनेत्री दिव्या सिंग (फिल्म प्रोड्युसर), *डॉ. गौरव हंस (Wrongs International Director UK)*, आणि *बोधिसत्व फाउंडेशनचे अविनाश कांबळे* उपस्थित होते. मागे बॅनरवर “DR. BR AMBEDKAR LIFE JOURNEY & INDO-UK FREE TRADE SUMMIT @ BRITISH PARLIAMENT LONDON – 27th APRIL 2027” स्पष्ट दिसत आहे.
भारतीय संविधानाच्या ७५ व्या अमृतमहोत्सवाचा जागर आता लंडनच्या संसदेत होणार आहे. बोधिसत्व फाउंडेशन मुंबई आणि बीबीएमजी फाउंडेशन लंडन यांच्या संयुक्त विद्यमाने *२७ एप्रिल ते २ मे २०२७* दरम्यान लंडन पार्लमेंटमध्ये भव्य सोहळा होणार आहे.
यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील बायोपिक, थिएट्रिकल सादरीकरण आणि इंडो-यूके फ्री ट्रेड समिट Chapter 10 होणार आहे.
या सोहळ्याला ऋषी सुनक, किरण रिजिजू, पियुष गोयल, रामदास आठवले, संजय शिरसाट, महिंदा राजपक्षे यांच्यासह अनेक देशांचे मंत्री, खासदार उपस्थित राहणार आहेत.
*फोटो क्रेडिट: Mai Media 24*
*वाचा सविस्तर: http://mai24news.in*
*#LondonParliament #Constitution75 #MumbaiMarathiPatrakarSangh #AvinashKamble #DrGauravHans #DivyaSingh #MaiMedia24*
—






















