Home मुंबई *मुसळगाव वीज पारेषण प्रकल्पासाठी महापारेषणने एसपीव्हीचा घेतला ताबा*

*मुसळगाव वीज पारेषण प्रकल्पासाठी महापारेषणने एसपीव्हीचा घेतला ताबा*

12
0

*मुसळगाव वीज पारेषण प्रकल्पासाठी महापारेषणने एसपीव्हीचा घेतला ताबा*

*मुंबई, दि. ९ सप्टेंबर -* महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी (महापारेषण) ने नाशिक जिल्ह्यातील *२२०/१३२/३३ के.व्ही. मुसळगाव अतिउच्चदाब वीज उपकेंद्र* स्थापनेच्या प्रकल्पासाठी ‘मुसळगाव पॉवर ट्रान्समिशन लिमिटेड’ या विशेष उद्देश वाहनाचा (SPV) ताबा आरईसी पॉवर डेव्हलपमेंट अँड कन्सल्टन्सी लिमिटेडकडून घेतला आहे.

*प्रकल्पाची वैशिष्ट्ये:*
– *क्षमता वाढ:* ३०० एमव्हीए अतिरिक्त परिवर्तन क्षमता
– *वाहिन्या:* एकूण १२१ किमी – १०२ किमी २२० के.व्ही. + १९ किमी १३२ के.व्ही.
– *पद्धत:* TBCB प्रक्रियेद्वारे BOOT पद्धतीने
– *डेडलाईन:* ८ सप्टेंबर २०२७ पर्यंत व्यावसायिक कार्यान्वयन

*फायदा काय?*
नाशिक व परिसरातील वीजपुरवठा अधिक सक्षम, स्थिर आणि विश्वासार्ह होणार. वाढत्या विजेची मागणी पूर्ण होणार.

या यशासाठी महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक *विक्रम कुमार (भा.प्र.से.)*, संचालक दत्तात्रय पडळकर, सतीश चव्हाण आणि तृप्ती मुधोळकर यांच्या नेतृत्वाखाली टीमचे कौतुक करण्यात आले.


*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here