*वसई-विरार काँग्रेसचा महावितरणविरोधातील ठिय्या स्थगित*
*विरार -* स्मार्ट मीटर, अवास्तव वीज बिल आणि वारंवार खंडित होणारी वीजसेवा याविरोधात *वसई विरार शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस सोहेल खान* यांनी गेले *३७ दिवस* महावितरण कार्यालय विरार येथे ठिय्या आंदोलन केले होते.
या आंदोलनाची दखल *प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ* व वरिष्ठ उपाध्यक्ष *ॲड. गणेश पाटील* यांनी घेतली.
*पुढील भूमिका:*
– गणेशोत्सवानंतर काँग्रेसचे मोठे जन आंदोलन
– महावितरणच्या कारभाराविरोधात विधिमंडळात आवाज उठवणार
येत्या सणामुळे आंदोलन स्थगित करण्याचे प्रदेश काँग्रेसचे पत्र घेऊन प्रदेश सरचिटणीस *दिनेश कांबळे, डॉमनिक डिमेलो*, प्रदेश सचिव संदीप सिंह, जिल्हाध्यक्ष निलेश पेंढारी आदींनी सोहेल खान यांची भेट घेतली. महावितरणचे कार्यकारी अभियंता लेले यांनी लेखी उत्तर दिले.
यावेळी प्रकाश पाटील, रामदास वाघमारे यांसह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*माहिती: ॲड. संदेश कोंडविलकर, सरचिटणीस, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी*
—





















