संसदेत महाराष्ट्राचा गौरव! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना ३ आंतरराष्ट्रीय पुरस्कार
*मुंबई, दि. ९ -* उपमुख्यमंत्री *एकनाथ शिंदे* यांच्या कामाची दखल आता आंतरराष्ट्रीय स्तरावर घेतली गेली आहे. ब्रिटनच्या संसदेत त्यांना तीन मानाच्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येणार आहे. यासाठी ते काल मध्यरात्री लंडनला रवाना झाले आहेत.
*कोणते पुरस्कार मिळणार?*
१. *हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये* – ‘कॉमनवेल्थ पब्लिक लीडरशिप रिकग्निशन’ पुरस्कार (आज, ९ सप्टेंबर)
२. *हाऊस ऑफ कॉमन्समध्ये* – ‘स्टेट्समनशिप अवॉर्ड’ – इंटरनॅशनल कॉन्क्लेव्ह २०२६ मध्ये
३. *महाराष्ट्र मंडळ, लंडन* – ‘ग्लोबल प्राईड ऑफ महाराष्ट्र’ (९४ वर्षांचा इतिहास असलेले मंडळ)
*का मिळतोय सन्मान?*
शिंदे यांनी राबवलेल्या ३ योजनांची विशेष दखल ब्रिटनमध्ये घेण्यात आली आहे:
– मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना
– शासन आपल्या दारी
– मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना
ब्रिटनमधील मुलांनी ‘लाडकी बहीण’ आणि ‘शासन आपल्या दारी’ योजनेवर चित्रे काढली असून ती ‘कॅनव्हास फॉर केअर’ प्रदर्शनात मांडली जाणार आहेत.
या दौऱ्यात शिंदे महाराष्ट्राच्या विकासाचं व्हिजन आणि भारत-यूके गुंतवणुकीवर मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यक्रमाला ब्रिटनचे मंत्री, महापौर, विविध देशांचे राजदूत उपस्थित राहणार आहेत.
—




















