Home नाटक / चित्रपट / मालिका / समीक्षा “उजेड पेरणारी माणसं”

“उजेड पेरणारी माणसं”

31
0

“उजेड पेरणारी माणसं”

कै. दीपक सुरेखा अरुण पाटकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ समस्त पाटकर परिवारांकडून इयत्ता दहावी व बारावी 2026 परिक्षेत सुयश प्राप्त झालेल्या १९ विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यातील गवसे येथील केंद्रीय विद्यालय येथे सोमवार दि 24 ऑगस्ट 2026 रोजी पार पडलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते महादेव हेब्बाळकर होते.
पॉवरलिफ्टिंग स्पोर्ट्स असोसिएशन रायगड चे सचिव आणि राज्य पॉवरलिफ्टिंग असोशिएशनचे सदस्य माननीय अरुण पाटकर यांनी सर्व विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व रोख रक्कम बक्षीसरूपाने बहाल केली. तसेच भविष्यात विद्यार्थ्यांना क्रीडाक्षेत्राविषयी गोडी लावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे नमुद केले. पॉवरलिफ्टिंग खेळाच्या स्पर्धा आयोजनाविषयीपण त्यांनी आपले विचार मांडले.
त्यावेळी संपन्न झालेल्या कार्यक्रमात ‘दैनिक पुढारी राज्यस्तरीय पुरस्कार’ प्राप्त आदर्श शिक्षक उत्तम कोकीतकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष ‘श्री दिगंबर पाटील, उपाध्यक्ष सुमन हेब्बाळकर, सामाजिक कार्य राज्य पुरस्कार मिळाल्याबद्दल अविनाश हेब्बाळकर यांना सुद्धा पाटकर परिवाराकडून गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक अनिल शेंडे सर यांनी केले.त्यावेळी माननीय अरुण लक्ष्मण पाटकर, संदीप पाटकर, ग्रामसेवक अधिकारी श्री विशाल दुंडगेकर साहेब,श्री.उत्तम कोकीतकर सर यांनी मनोगत व्यक्त केली. अध्यक्ष माननीय हेब्बाळकर यांनी पाटकर परिवाराचे मनस्वी कौतुक केले, त्यांच्या पुढील वाटचालीला शुभेच्छा दिल्या.
त्यावेळी कृष्णा पाटकर, जयवंत पाटकर’ तसेच शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, ग्रामस्थ, विद्यार्थी उपस्थित होते.गीता तेजम मॅडम यांच्या बहारदार सुत्रसंचालनाने कार्यक्रमाची रंगता वाढली. आभार सौ स्वाती देवरे मॅडम यांनी मानले.कार्यक्रमास विशेष सहकार्य श्री.प्रकाश बडे सर यांनी केले. या कार्यक्रमासाठी सौ. सुरेखा अरुण पाटकर, गीतांजली पाटकर, महादेव लक्ष्मण पाटकर, अशोक लक्ष्मण पाटकर, दत्ताराम लक्ष्मण पाटकर, आशिष अशोक पाटकर, आकाश अशोक पाटकर, अथर्व दत्ताराम पाटकर, संदीप कृष्णा पाटकर, आनंद रामा पाटकर यांनी मोलाचे सहकार्य केले.
देवानं आपल्याला जे दिलय त्यातलं थोडं इतरांना देऊन पाहावं. देव होता नाही आलं तरी माणूस होऊन जगावं.
या सुभाषिताची आठवण माननीय श्री. अरुण लक्ष्मण पाटकर सर आणि समस्त पाटकर परिवाराचे कार्य पाहून झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here