* ‘पाथेर पांचाली’च्या माध्यमातून सत्यजित रे यांच्या चित्रभाषेचा अनुभव घेण्याची संधी – दादासाहेब फाळके रसास्वाद मंडळाचा उपक्रम*
*मुंबई, दि. २७ ऑगस्ट:* भारतीय चित्रपटसृष्टीतील अजरामर कलाकृती ‘पाथेर पांचाली’ चे विशेष प्रदर्शन मुंबईत होणार आहे. महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळांतर्गत दादासाहेब फाळके रसास्वाद मंडळ आणि माहिती व सांस्कृतिक व्यवहार विभाग, पश्चिम बंगाल शासन यांच्या सौजन्याने हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे.
*कधी आणि कुठे?*
*सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६, सायंकाळी ७ वाजता*
स्थळ: पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, तिसरा मजला, लघु नाट्यगृह, प्रभादेवी, मुंबई.
जागतिक चित्रपटविश्वात आपल्या संवेदनशील आणि वास्तववादी चित्रभाषेने वेगळी ओळख निर्माण करणारे दिग्दर्शक सत्यजित रे यांच्या या कलाकृतीला भारतीय सिनेमाच्या इतिहासात विशेष स्थान आहे. ग्रामीण जीवन, मानवी नातेसंबंध, संघर्ष आणि भावविश्व यांचे अत्यंत तरल चित्रण या चित्रपटात अनुभवता येते.
या विशेष प्रदर्शनासाठी *प्रवेश विनामूल्य* असून, रसास्वाद मंडळाच्या सभासदांना प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे. अधिकाधिक मराठी चित्रपटप्रेमींनी या अभिजात कलाकृतीचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालिका *स्वाती म्हसे-पाटील* यांनी केले आहे.
—
*






















