Home पत्रकार COEP प्रकरण – परवानगीशिवाय कॅम्पसमध्ये प्रवेश करून इंटरव्यू घेतल्याने गुन्हा – कॉलेज...

COEP प्रकरण – परवानगीशिवाय कॅम्पसमध्ये प्रवेश करून इंटरव्यू घेतल्याने गुन्हा – कॉलेज प्रशासनाचा दावा, तर “पत्रकारावर तक्रार दाखल करणे ही लोकशाहीची गळचेपी आहे. बातमीदारी करणं हे पत्रकाराचं कर्तव्य आहे. एबीपी माझाचे पत्रकार मंदार गोंजारी यांना तक्रारीतून तत्काळ वगळणे आवश्यक -शीतल हरीश करदेकर,मीडिया असोसिएशन ऑफ इंडिया

8
0

COEP प्रकरण – परवानगीशिवाय कॅम्पसमध्ये प्रवेश करून इंटरव्यू घेतल्याने गुन्हा – कॉलेज प्रशासनाचा दावा, तर पत्रकार संघटनांचा आक्षेप*

*पुणे | MAI MEDIA 24 | २७ ऑगस्ट*

COEP टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीने एबीपी माझाचे पत्रकार मंदार गोंजारी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यामागचे कारण स्पष्ट केले आहे.

कॉलेज प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, *शासकीय कॉलेजच्या आवारात विनापरवानगी प्रवेश करून, विद्यार्थ्यांचे इंटरव्यू घेण्यात आले, त्यामुळे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.*

COEP चे मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ. राजू पाचकोर यांनी दिलेल्या तक्रारीवरून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिते (BNS) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

*दोन बाजू – एक प्रकरण:*

*१. कॉलेज प्रशासनाची बाजू:* शासकीय शैक्षणिक परिसरात कोणत्याही प्रकारच्या शूटिंग किंवा इंटरव्यूसाठी पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक आहे. विनापरवानगी कॅम्पसमध्ये येऊन विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण केल्याचा आरोप.

पत्रकार संघटनांची बाजू:* फी वाढीसारख्या जनहिताच्या विषयावर बातमीदारी करणे हे पत्रकाराचे कर्तव्य आहे. कॅमेरासह उघडपणे वार्तांकन करणाऱ्या पत्रकारावर BNS सारखी गंभीर कलमं लावणे म्हणजे *लोकशाहीची गळचेपी* आहे.

या पार्श्वभूमीवर मीडिया असोसिएशन ऑफ इंडियाच्या संस्थापक अध्यक्ष *शीतल हरीश करदेकर* यांनी मागणी केली आहे की –

> *”पत्रकारावर तक्रार दाखल करणे ही लोकशाहीची गळचेपी आहे. बातमीदारी करणं हे पत्रकाराचं कर्तव्य आहे. एबीपी माझाचे पत्रकार मंदार गोंजारी यांना तक्रारीतून तत्काळ वगळणे आवश्यक आहे.”*

पुणे पोलीस आयुक्तांनी या प्रकरणात मध्यस्थी करून, पत्रकार आणि शैक्षणिक संस्था यांच्यात समन्वय घडवावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

*MAI MEDIA 24 ची भूमिका: बातमीदारीसाठी संवाद हवा, गुन्हे नकोत.*

#COEP #Pune #MandarGonjari #ABPMajha #ShitalKardekar #MAIMEDIA24 #PressFreedom

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here