*मुंबई किनारा रस्ता उत्तर – ६० किमी मेगा प्रोजेक्ट – वेसावे ते भाईंदर १५ मिनिटांत – अभिजीत बांगर यांची पाहणी* | MAI MEDIA 24
* मुंबई महानगरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी BMC चा महत्वाकांक्षी प्रकल्प – ६० किमी, ७पॅकेज, जुळे बोगदे, केबल ब्रिज – चारकोप येथे काम सुरू
मुंबई, दि. २६ ऑगस्ट – *मुंबई महानगरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी व सुगम, अखंड प्रवासाच्या उद्देशाने बृहन्मुंबई महानगरपालिकेने मुंबई किनारा रस्ता (उत्तर) हा महत्वाकांक्षी पायाभूत सुविधा प्रकल्प हाती घेतला आहे. संपूर्ण मुंबईचा किनार पट्टा यामुळे एकमेकांना जोडला जाणार आहे.*
*६० किमीचा मेगा प्रोजेक्ट -*
मुंबई किनारा रस्ता (उत्तर) हा मेगा प्रकल्प आंतरबदल व जोडरस्त्यासह सुमारे ६० किलोमीटरचा असून वेसावे – भाईंदर ही नगरे किनारा रस्त्याने जोडली जाणार आहेत. त्यामुळे वेसावे ते भाईंदर प्रवासाचा कालावधी ९० ते १२० मिनिटांवरून केवळ १५ते २० मिनिटांवर येणार आहे.
*७पॅकेजमध्ये विभागणी -*
या प्रकल्पाच्या उभारणीचे काम A, B, C, D, E, F आणि दहिसर भाईंदर जोड रस्ता (DBLR) अशा एकूण सात टप्प्यांमध्ये विभागण्यात आले आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून दुहेरी उन्नत मार्ग (Double Elevated Roads), खारफुटी क्षेत्रातील खांबांवरील रस्ता (Roads on Stilts), २ केबल आधारीत पूल, ४बास्केट पूल, सुमारे १५ मीटर व्यासाचे २जुळे बोगदे आणि १० आंतरबदल (Interchanges) अशा विविध पायाभूत सुविधा उभारण्यात येणार आहेत.
*चारकोप येथे जुळे बोगदे -*
पॅकेज C मध्ये माईंडस्पेस मालाड ते चारकोप खाडीदरम्यान उत्तर दिशेने जाणाऱ्या ३.९ किमी लांबीच्या बोगद्याचा आणि पॅकेज D मध्ये चारकोप खाडी ते माईंडस्पेस मालाड दरम्यान दक्षिण दिशेने जाणाऱ्या ३.९ किमी लांबीच्या जुळ्या बोगद्यांचा समावेश आहे.
*अतिरिक्त आयुक्तांची पाहणी -*
अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी प्रकल्पस्थळास प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. चारकोप येथे बोगद्याच्या बांधकामासाठी शाफ्ट उभारण्यात येणार असून त्यासाठी ६० मीटर × ४० मीटर क्षेत्रफळाच्या जागेवर खोदकाम सुरू करण्यात आले असून पायलिंगचे काम सुरु आहे. बोगदा खणन संयंत्राचे (TBM) सुटे भाग डिसेंबर 2026 मध्ये उपलब्ध होणार आहेत. त्यानंतर पुढील दोन महिन्यात असेंब्ली पूर्ण करून खोदकाम सुरू करणे अपेक्षित आहे.
*गुणवत्तापूर्ण कामाचे निर्देश -*
या किनारा रस्ते प्रकल्पाची कामे गुणवत्तापूर्ण आणि निर्धारित कालावधीत पूर्ण करावीत, असे निर्देश बांगर यांनी दिले. यावेळी प्रमुख अभियंता (रस्ते व वाहतूक) मांतय्या स्वामी, कार्यकारी अभियंता वैभव गांधी उपस्थित होते.
*Tags:* #MumbaiCoastalRoad #BMC #AbhijitBangar #VersovaBhayandar #MAIMEDIA24
























