Home नाटक / चित्रपट / मालिका / समीक्षा भविष्यवाणीचे मनोविज्ञान: मानवी भावनाच भविष्य घडवते* – रा.ग. सोनुने गुरुजी यांचा विशेष...

भविष्यवाणीचे मनोविज्ञान: मानवी भावनाच भविष्य घडवते* – रा.ग. सोनुने गुरुजी यांचा विशेष लेख

14
0

*Category:* लेख / वैचारिक

*भविष्यवाणीचे मनोविज्ञान: मानवी भावनाच भविष्य घडवते* –
रा.ग. सोनुने गुरुजी यांचा विशेष लेख

*Slug:* `bhavishyavaniche-manovidnyan-rag-sonune-buldhana-lekh`

* नकारात्मक भावनिक ऊर्जेमुळेच युद्ध, तापमानवाढ आणि नैतिक अध:पतन होते का? नास्रेदमस आणि बाबा वेंगा यांच्या भविष्यवाणीमागील मनोवैज्ञानिक तथ्य – वाचा रा.ग. सोनुने, बुलढाणा यांचा वैचारिक लेख.

⏳ भविष्यवाणीचे मनोविज्ञान

मनुष्याची भावना भूत-वर्तमान-भविष्य जाणण्याचे सशक्त माध्यम आहे. भावनात्मक क्रियाकलाप सभोवताली परिस्थिती तयार करते. प्रबळ इच्छा व शक्तीशाली अपेक्षा परिस्थिती निर्माण करते.

जेव्हा-जेव्हा नकारात्मक ऊर्जा मनुष्याच्या आसपास तयार होते, तेव्हा ती ऊर्जा घातक सिद्ध होते. निर्माण झालेली घातक ऊर्जा युद्ध, वैश्विक तापमानात बदल, नैतिक अध:पतन, आर्थिक अध:पतन इ. स्थिती तयार करते.

या साऱ्या समस्येमागे मनुष्याची भावनिक नकारात्मक ऊर्जा काम करते. नकारात्मक ऊर्जेमुळे मनुष्य बऱ्याचदा राहते घर सोडतो, प्रस्थापित पद सोडतो. आज वाढत्या भावनिक नकारात्मक ऊर्जेमुळे मनुष्य पृथ्वी सोडण्याचा विचार करत आहे. दुसरा राहण्याजोगा ग्रह मनुष्य शोधत आहे.

पृथ्वीवरील करोडो लोकांची भावनिक नकारात्मक ऊर्जा वाढल्याने जागतिक तापमानवाढ झाली असावी, असे म्हटले तर चुकीचे होणार नाही. त्यामुळे आज निर्माण झालेली भावनिक नकारात्मक ऊर्जा उद्या मनुष्यजातीचे नुकसान करेल हे सांगण्यासाठी कोणत्याही भविष्यकर्त्याची गरज नाही.

नास्रेदमस किंवा बाबा वेंगा यांनी मानवी भावनेचा सूक्ष्म अभ्यास करून होणाऱ्या संकटाचा अंदाज बांधला. पण जेव्हा भविष्यवाणीचे मनोविज्ञान समजून घेतले जाते, तेव्हा हे अंदाज, अंदाज राहत नाही तर ते वास्तवात उतरतात.

ज्या-ज्या बाबींचा विचार मनुष्यजातीने केलेला आहे, करणार आहे त्या-त्या बाबी दृष्टीपथास आल्या आहेत, येत आहेत व येतील. उदा. समुद्राखाली लोकवस्ती, परग्रहावर वस्तीचा विचार, कृत्रिम सूर्य निर्मिती, टेलीपॅथीच्या माध्यमातून दूर राहणाऱ्या माणसाचा विचार, रेकीच्या माध्यमातून हिलिंग इ. भविष्यवाणीमागे मानवी भावनेचा सूक्ष्म अभ्यास, हे ‘मनोवैज्ञानिक तथ्य’ नाकारता येत नाही.

*लेखक: 🖊️ रा.ग. सोनुने, बुलढाणा*

*Tags:* R G Sonune, Buldhana, Bhavishyavani, Manovidnyan, Nostradamus, Baba Vanga, Lekh, Vaicharik

*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here