*Category:* मुंबई / लोकभवन / ब्रेकिंग
*Title:* न्या. सुनील शुक्रे यांनी घेतली महाराष्ट्र लोकायुक्त अध्यक्षपदाची शपथ – लोकभवनात सोहळा संपन्न
*Slug:* `nya-sunil-shukre-maharashtra-lokayukta-adhyaksha-shapath-25-august`
*Content:*
मुंबई उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमूर्ती सुनील बाळकृष्ण शुक्रे यांनी मंगळवारी (दि. २५ ऑगस्ट) राज्याच्या लोकायुक्त संस्थेच्या अध्यक्ष पदाची शपथ घेतली.
लोकभवन मुंबई येथे झालेल्या छोटेखानी शपथविधी सोहळ्यात राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी त्यांना पदाची शपथ दिली. त्यांची नियुक्ती २०२३ च्या नव्या महाराष्ट्र लोकायुक्त कायद्यानुसार ५ वर्षांसाठी किंवा वयाची ७० वर्षे पूर्ण होईपर्यंत करण्यात आली आहे.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, आमदार भास्कर जाधव, मावळते लोकायुक्त न्या. विद्यासागर कानडे, गोवा लोकायुक्त न्या. संदीप शिंदे, मुख्य सचिव राजेश अग्रवाल उपस्थित होते.
न्या. शुक्रे यांचा जन्म २५ ऑक्टोबर १९६१ रोजी झाला. पुणे विद्यापीठातून पदवी, अमरावती येथे एलएलबी, नागपूर विद्यापीठातून घटनात्मक कायद्यात एलएलएम. २००० साली न्यायिक सेवेत रुजू, कोल्हापूर, नागपूर येथे प्रधान जिल्हा न्यायाधीश, २०११ मध्ये मुंबई उच्च न्यायालयाचे रजिस्ट्रार जनरल, २०१३ मध्ये न्यायाधीश म्हणून पदोन्नती, ऑक्टोबर २०२३ मध्ये सेवानिवृत्त.
*Tags:* Sunil Shukre, Lokayukta, Jishnu Dev Varma, Lok Bhavan, Devendra Fadnavis, Eknath Shinde
*





















