Home मुंबई आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे महायुती सरकारचे दुर्लक्ष – १३ दिवसापासून उपोषण – हर्षवर्धन...

आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे महायुती सरकारचे दुर्लक्ष – १३ दिवसापासून उपोषण – हर्षवर्धन सपकाळ यांचा हल्लाबोल – आदिवासी विकास मंत्र्यांची हकालपट्टी करा!*

18
0

*शीर्षक:
*आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे महायुती सरकारचे दुर्लक्ष – १३ दिवसापासून उपोषण – हर्षवर्धन सपकाळ यांचा हल्लाबोल – आदिवासी विकास मंत्र्यांची हकालपट्टी करा!*

*मुंबई/नाशिक, दि. २५ ऑगस्ट:* राज्यात पुणे, नाशिक, वर्धा, पालघर सह अनेक ठिकाणी आदिवासी विद्यार्थ्यांचे उपोषण गेल्या १३ दिवसांपासून सुरू आहे. पण भाजपा महायुती सरकार झोपले आहे का? असा संतप्त सवाल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.

आज नाशिक येथे उपोषणस्थळी भेट देऊन त्यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी खासदार शोभा बच्छाव, वरिष्ठ उपाध्यक्ष मोहन जोशी उपस्थित होते.

*हर्षवर्धन सपकाळ काय म्हणाले?*

“सरकार विकासाच्या मोठ्या गप्पा मारते, पण आदिवासी विद्यार्थ्यांकडे लक्ष द्यायला वेळ नाही. काल मंत्रिमंडळ बैठक झाली, पण यावर चर्चा नाही. हे सरकार आदिवासी विरोधी आहे. आदिवासी विभागात भ्रष्टाचार बोकाळला आहे, कोट्यवधींचा मलिदा खाल्ला जातोय, पण विद्यार्थ्यांना सुविधा नाहीत.”

“राहुल गांधी यांनी जातीने लक्ष देऊन मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र पाठवले आहे. जर उपोषणकर्त्या विद्यार्थ्यांना काही झाले तर सर्व जबाबदारी सरकार आणि मुख्यमंत्र्यांची असेल. रस्त्यावर उतरावे लागेल,” असा इशारा त्यांनी दिला.

*वैद्यकीय तपासणीच्या नावाखाली प्रेग्नन्सी टेस्ट?*

सपकाळ म्हणाले, “वैद्यकीय तपासणीच्या नावाखाली मुलींची प्रेग्नन्सी टेस्ट केली जाते, हा गंभीर प्रकार आहे. पण आदिवासी विकास मंत्री अशोक उईके हे राहुल गांधींना माहिती नाही म्हणतात. तुम्हाला तुमच्या विभागाची माहिती आहे का? १३ दिवस तुम्ही झोपा काढल्या का? मंत्री म्हणतात मी काही करू शकत नाही, मुख्यमंत्र्यांना भेटा. अशा लोकांना पदावर राहण्याचा अधिकार नाही, त्यांची हकालपट्टी करा!”

*- MAI MEDIA 24*


*SEO SLUG:* adivasi-vidyarthi-uposhan-harshwardhan-sapkal-nashik-rahul-gandhi-letter-fadnavis
*Tags:* Adivasi Vidyarthi, Harshwardhan Sapkal, Ashok Uike, Nashik Uposhan, Congress, Adivasi Vikas, Rahul Gandhi, Fadnavis

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here