Home मुंबई * मुंबई महापालिकेच्या आरोग्य व्यवस्थेचा बट्ट्याबोळ: संत मुक्ताबाई रुग्णालयात उपचारांअभावी रुग्ण बेहाल!...

* मुंबई महापालिकेच्या आरोग्य व्यवस्थेचा बट्ट्याबोळ: संत मुक्ताबाई रुग्णालयात उपचारांअभावी रुग्ण बेहाल! ॲड. अमोल मातेले यांचा हल्लाबोल

31
0

*हेडलाईन:* मुंबई महापालिकेच्या आरोग्य व्यवस्थेचा बट्ट्याबोळ: संत मुक्ताबाई रुग्णालयात उपचारांअभावी रुग्ण बेहाल! ॲड. अमोल मातेले यांचा हल्लाबोल

*सब-हेडलाईन:* डेंग्यूच्या रुग्णाला बेड नाकारला; ६ तासांच्या रांगेत रुग्णांचा वनवास, ८७पदे रिक्त असल्याचा पर्दाफाश

*मुंबई,

मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाचा कारभार पूर्णपणे कोलमडला असून, महापालिकेत भ्रष्टाचाराचा महापूर आला आहे. गोरगरीब रुग्णांच्या जिवाशी खेळ सुरू असून पालिकेची रुग्णालये केवळ ‘रेफरल सेंटर’ बनली आहेत, असा संतप्त आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार पक्षाचे ॲड. अमोल मातेले यांनी केला आहे.

घाटकोपर (पश्चिम) येथील संत मुक्ताबाई रुग्णालयात १७ ऑगस्ट रोजी डेंग्यूने गंभीर आजारी असलेल्या रुग्णाला ‘बेड उपलब्ध नाही’ असे सांगून तातडीने उपचार नाकारण्यात आले. या धक्कादायक प्रकारानंतर ॲड. अमोल मातेले यांनी पक्षाच्या शिष्टमंडळासह मुक्ताबाई रुग्णालयाची प्रत्यक्ष पाहणी केली आणि अधिष्ठाता (वैद्यकीय अधीक्षक) यांची भेट घेऊन जाब विचारला.

*पाहणीत उघड झालेले भयावह वास्तव:*

*१. उपचारासाठी ६ तासांचा वनवास:* रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या सर्वसामान्य रुग्णाला केस पेपर काढण्यासाठी २तास, डॉक्टरांना दाखवण्यासाठी २ तास आणि औषधे मिळवण्यासाठी २ तास अशा तब्बल ६ तासांच्या दीर्घ रांगेत उभे राहावे लागत आहे.

*२. मनुष्यबळाचा प्रचंड तुटवडा:*
– डॉक्टर: मंजूर ७०, भरलेली ४४, रिक्त २६
– निम्न वैद्यकीय कर्मचारी: मंजूर ४२, भरलेली १९, रिक्त २३
– परिचारिका: मंजूर ७१, भरलेली ६५, रिक्त ६
– कामगार वर्ग: मंजूर ८०, भरलेली ४८ रिक्त ३२

*३. हाऊसकीपिंग कंत्राटदाराचा भ्रष्टाचार:* एजन्सीने कराराप्रमाणे कामगार पुरवले नाहीत. कामगारांना वेळेवर पगार नाही, PF आणि ESIC लाभ नाहीत. स्वच्छता यंत्रणा कोलमडली आहे.

*प्रमुख मागण्या:*
१. १७ ऑगस्ट रोजी बेड नाकारल्याच्या प्रकाराची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी.
२. रिक्त पदे तातडीने भरावीत.
३. केस पेपर, OPD व औषध वाटप खिडक्यांची संख्या वाढवावी.
४. रिक्त व उपलब्ध बेड दर्शवणारा डिजिटल बोर्ड लावावा.
५ हाऊसकीपिंग कंत्राटदाराची चौकशी करून कामगारांना थकीत पगार व PF/ESIC द्यावे.

> “गरीब आणि गरजू नागरिकांसाठी पालिका रुग्णालये हाच मोठा आधार असतात. परंतु, मुक्ताबाई रुग्णालयात भ्रष्ट कारभारामुळे रुग्णांना उपचारांअभावी दारातून परत पाठवले जात आहे. प्रशासनाने तातडीने सुधारणा केली नाही, तर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने पालिकेच्या आरोग्य विभागाविरुद्ध तीव्र आंदोलन छेडले जाईल,” – *ॲड. अमोल मातेले*

या पाहणी दौऱ्यावेळी अक्षय खिल्लारी, कार्तिक घोंगे, किरणभाऊ मुके, सत्यवानदादा दळवी, निशांत जाधव, गणेश हाडवळे, शिंदे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here