Home मुंबई *युवा शास्त्रज्ञांसाठी पर्वणी ! जगदीशचंद्र भट्ट यांच्या ‘भारतीय अंतरिक्ष संशोधन कार्यक्रम’ पुस्तकाचे...

*युवा शास्त्रज्ञांसाठी पर्वणी ! जगदीशचंद्र भट्ट यांच्या ‘भारतीय अंतरिक्ष संशोधन कार्यक्रम’ पुस्तकाचे प्रकाशन

24
0

*युवा शास्त्रज्ञांसाठी पर्वणी ! जगदीशचंद्र भट्ट यांच्या ‘भारतीय अंतरिक्ष संशोधन कार्यक्रम’ पुस्तकाचे प्रकाशन

मुंबई, दि. (प्रतिनिधी) : गुजराती वृत्तपत्र सृष्टीतील विज्ञानविषयक संशोधन करणारे ज्येष्ठ पत्रकार श्री जगदीशचंद्र भट्ट यांच्या ‘भारतीय अंतरिक्ष संशोधन कार्यक्रम’ या माहितीपूर्ण पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच वरळीच्या नेहरु विज्ञान केंद्र येथे केंद्र संचालक उमेशकुमार रस्तोगी, प्रा. मयंक वहिया यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चचे निष्णात शास्त्रज्ञ प्रा. मयंक वहिया यांच्या मार्गदर्शनाखाली हे पुस्तक तयार करण्यात आले आहे. भारतीय अंतरिक्ष संशोधन क्षेत्राचे जनक प्रख्यात शास्त्रज्ञ डॉ. विक्रम साराभाई यांच्या जयंतीचे औचित्य साधून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या पुस्तकाद्वारे भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) ची आजवरची सर्वोत्तम कामगिरी तरुण पिढीला निश्चितच उपयोगी पडेल असा विश्वास प्रा. मयंक वहिया यांनी व्यक्त केला. जयरामन, भूकंप तज्ज्ञ एस के अरोरा, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ जियोमॅग्नेटिझम चे अजय धर यांच्या सह देशातील नावाजलेले शास्त्रज्ञ ‌या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते. विविध मान्यवरांनी यावेळी पत्रकारितेतील विज्ञानविषयक संशोधन क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल आणि त्याची योग्य ती नोंद गुजरात समाचार या अग्रगण्य वर्तमानपत्राद्वारे तेथील ज्येष्ठ विज्ञानविषयक पत्रकार जगदीशचंद्र भट्ट यांचा खास गौरव करण्यात आला. येणाऱ्या तरुण पिढीला प्रेरणा देणारे हे पुस्तक ठरेल अशी प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली.*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here