Home मुंबई *गोरेगाव पश्चिमेतील रहिवाशांना मोठा दिलासा*

*गोरेगाव पश्चिमेतील रहिवाशांना मोठा दिलासा*

22
0

*गोरेगाव पश्चिमेतील रहिवाशांना मोठा दिलासा*
*नवीन ‘सीटीएस’ क्रमांकासाठी महसूलमंत्र्यांचा हिरवा कंदील*
• *१९६२ पासून वास्तव्यास असलेल्या १०० हून अधिक रहिवाशांना मिळणार न्याय*
• *जिल्हाधिकाऱ्यांना नवीन प्रस्तावासाठी तातडीने दिले आदेश*

मुंबई, दि. १९
गोरेगाव पश्चिम (मुंबई उपनगर) येथील एस. व्ही. रोड परिसरातील रहिवाशांच्या अनेक वर्षांची प्रतीक्षा आता संपणार आहे. सिद्धीविनायक मंदिरासमोर तसेच मेनन इंडस्ट्रीजजवळील रहिवासी भूखंडाला नवीन नगर भूमापन (सी.टी.एस – CTS) क्रमांक उपलब्ध करून देण्याबाबत महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी निर्णय घेतला आहे.

या प्रलंबित प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी मंत्रालयात एक विशेष बैठक पार पडली. बैठकीला आमदार प्रकाश सुर्वे आणि परिसरातील नागरिक उपस्थित होते.

नाल्याच्या तांत्रिक अडचणींवर मार्ग
या भागात १९६२ पासून शंभरहून अधिक लोकांची वस्ती आहे. या बैठकीत सुरुवातीला मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी प्रशासकीय बाजू मांडताना स्पष्ट केले होते की, संबंधित जागेवर नाला असल्याने त्यावर झालेले अतिक्रमण कायदेशीररीत्या मान्य करता येणार नाही.
मात्र, आमदार प्रकाश सुर्वे म्हणाले,”नाल्याच्या पुढे मोकळी जागा असून, तिथे गेल्या अनेक वर्षांपासून नागरिकांचे वास्तव्य आहे. या रहिवाशांचा हक्क डावलता येणार नाही, त्यांना न्याय मिळायलाच हवा,”
जिल्हाधिकाऱ्यांना आमदारांसोबत तातडीने बैठक घ्यावी आणि या भूखंडाला नवीन ‘सीटीएस’ क्रमांक उपलब्ध करून देण्यासाठीचा अधिकृत प्रस्ताव शासनाकडे सादर करावा अशा सुचना महसूल मंत्री बावनकुळे यांनी केल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here