Home संमेलन / अधिवेशन / सण / उत्सव *खालापूर येथील एन.डी.स्टुडिओमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा*

*खालापूर येथील एन.डी.स्टुडिओमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा*

32
0

*मुख्य कार्यकारी अधिकारी तथा सह व्यवस्थापकीय संचालक प्रशांत साजणीकर यांच्या हस्ते ध्वजारोहण*;

खालापूर १५ : कर्जत येथील एन.डी. स्टुडिओमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहपूर्ण आणि देशभक्तीच्या वातावरणात साजरा करण्यात आला. मुख्य कार्यकारी अधिकारी तथा महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक प्रशांत साजणीकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

या कार्यक्रमास मुख्य प्रशासकीय अधिकारी तथा मुख्य वित्तीय अधिकारी चित्रलेखा खातू, लेखाधिकारी महेश भांगरे, इतर अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी साजणीकर यांनी उपस्थितांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देत, चित्रपट आणि सांस्कृतिक क्षेत्राच्या विकासात एन.डी. स्टुडिओसारख्या चित्रीकरण स्थळांचे महत्त्व अधोरेखित केले. महाराष्ट्राच्या समृद्ध कलाविश्वाला अधिक बळ देण्यासाठी महामंडळाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
…………..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here