Home मुंबई *इतिहास महाराष्ट्राचा’ या उपक्रमांतर्गत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनकार्यावर आधारित सादरीकरण प्राथमिक...

*इतिहास महाराष्ट्राचा’ या उपक्रमांतर्गत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनकार्यावर आधारित सादरीकरण प्राथमिक फेरीचे उद्‌घाटन, माटुंग्याचे यशवंत नाट्य मंदिर, बी हॉल येथे बालरंगभूमी परिषद च्या व नवनिर्वाचित बृहन्मुंबई शाखा अध्यक्ष नीलमताई शिर्के – सामंत यांच्या हस्ते संपन्न*

14
0

*इतिहास महाराष्ट्राचा’ या उपक्रमांतर्गत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनकार्यावर आधारित सादरीकरण प्राथमिक फेरीचे उद्‌घाटन, माटुंग्याचे यशवंत नाट्य मंदिर, बी हॉल येथे बालरंगभूमी परिषद च्या व नवनिर्वाचित बृहन्मुंबई शाखा अध्यक्ष नीलमताई शिर्के – सामंत यांच्या हस्ते संपन्न*

मराठी बालनाट्य दिवसानिमित्ताने बालरंगभूमी परिषद बृहन्मुंबई शाखेच्या वतीने आयोजित ‘इतिहास महाराष्ट्राचा’ या अत्यंत प्रेरणादायी उपक्रमांतर्गत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनकार्यावर आधारित सादरीकरणाची प्राथमिक फेरीचे उद्‌घाटन, माटुंग्याचे यशवंत नाट्य मंदिर, बी हॉल येथे बालरंगभूमी परिषद च्या व नवनिर्वाचित बृहन्मुंबई शाखा अध्यक्ष नीलमताई शिर्के – सामंत यांनी केले.

यावेळी उपस्थितांशी संवाद साधतांना, बालमनांमध्ये कलेची गोडी निर्माण करणे, त्यांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देणे आणि समृद्ध बालरंगभूमीचा वारसा अधिक जोमाने पुढे चालवणे हेच आमचे ध्येय असून, नाट्यसंस्कृतीच्या या पवित्र वाटेवर आपल्या लाडक्या बालकलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी बालरंगभूमी परिषद नेहमीच कटिबद्ध आहे. संस्कारक्षम बालकांद्वारे उद्याची एक सशक्त आणि सुंदर नाट्यपरंपरा घडवण्याच्या या प्रवासात आपले सहकार्य आणि प्रेम हीच आमची खरी ऊर्जा आहे.
यावेळी बालरंगभूमी परिषद बृहन्मुंबई शाखेच्या कार्याध्यक्ष ज्योती निसळ, उपाध्यक्ष सुनिल सागवेकर, रत्नकांत जगताप, प्रमुख कार्यवाह विश्वास धुमाळ, कोषाध्यक्ष यशोदा माळकर, सहकार्यवाह महेश कापोडस्कर, वैशाली जोशी यांच्यासह कार्यकारिणीतील सदस्यांची उपस्थिती होती.
लहान मुलांनी स्पर्धेत भाग घेऊन जो उत्साह आणि प्रतिसाद दिला दाखवला त्याला तोड नाही…

#BalrangbhumiParishad #Mumbai #Brihanmumbai #MarathiBalnatyaDivas #ItihasMaharashtracha #ChildrenTheater #MarathiTheatre #BalNatya #CulturalHeritage #marathiculture

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here