Home संभाजीनगर तुकाराम मुंढेंना धक्का; २९ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची तक्रार, नरहरी झिरवळांना पत्र

तुकाराम मुंढेंना धक्का; २९ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची तक्रार, नरहरी झिरवळांना पत्र

15
0

तुकाराम मुंढेंना धक्का; २९ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची तक्रार, नरहरी झिरवळांना पत्र

छत्रपती संभाजीनगर: एफडीएच्या माध्यमातून अनेक संस्थांवर कारवाईचा बडगा उगारणारे अन्न आणि औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे (Tukaram Munde) यांच्याविरोधात आता कर्मचारी, अधिकाऱ्यांनी तक्रारी केल्या आहेत. छत्रपती संभाजीनगरच्या राज्य अन्न आणि औषध प्रशासन प्रयोगशाळेत सर्वकाही आलबेल नसल्याचं समोर आलंय. प्रयोगशाळेचे सहसंचालक तुकाराम मुंढे यांच्या कार्यपद्धतीवर तब्बल २९ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आक्षेप घेतला आहे. खात्याचे मंत्री नरहरी झिरवाळ (Narhari Zirwal) यांच्याकडे तशी तक्रार करण्यात आली आहे.

छत्रपती संभाजीनगरच्या राज्य अन्न व औषध प्रशासन प्रयोगशाळेत सर्व काही आलबेल नसल्याचं समोर आलंय. प्रयोगशाळेचे सहसंचालक तुकाराम मुंढे यांच्या कार्यपद्धतीविरोधात प्रयोगशाळेतील तब्बल २९ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे. १५ जुलै रोजी पाठवण्यात आलेल्या या निवेदनात दोन शिफ्टमध्ये काम करण्याचा निर्णय, शनिवार-रविवार आणि सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी कामाचे आदेश, रिक्त पदांमुळे वाढलेला कामाचा ताण आणि त्यामुळे नमुन्यांच्या तपासणीच्या गुणवत्तेवर परिणाम होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या तक्रारपत्रावर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सह्याही आहेत. नेमके कोणते आक्षेप कर्मचाऱ्यांनी घेतले आहेत. (Tukaram Munde FDA)

तुकाराम मुंढे यांच्यावर कर्मचाऱ्यांचे नेमके आक्षेप काय? (Tukaram Mundhe News)
सहसंचालक तुकाराम मुंढे यांच्या कार्यपद्धतीविरोधात २९ अधिकारी-कर्मचाऱ्यांची लेखी तक्रार.
१५जुलै रोजी मंत्री नरहरी झिरवळ यांच्याकडे निवेदन सादर.
प्रयोगशाळेत अचानक दोन शिफ्ट सुरू करण्याचा निर्णय घेतला गेला, मात्र त्यासाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध नाही.
रिक्त पदे मोठ्या प्रमाणावर असून विद्यमान कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा ताण पडत आहे.
सकाळी ९ ते रात्री १२ अशा वाढीव वेळेत काम करावे लागत असल्याचा आरोप.
शनिवार, रविवार आणि सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही काम करण्याचे आदेश देण्यात आल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी.
वाढलेल्या कामाच्या तुलनेत अतिरिक्त कर्मचारी, तांत्रिक सहाय्यक आणि संसाधने उपलब्ध करून देण्यात आलेली नाहीत.
अन्न, औषध आणि सौंदर्यप्रसाधनांच्या प्रलंबित नमुन्यांचा निपटारा करण्यासाठी घाई केली जात असून त्यामुळे विश्लेषणाच्या गुणवत्तेवर परिणाम होण्याची भीती व्यक्त.
भारतीय औषध संहिता (IP), ब्रिटिश (BP), USP अशा मानकांनुसार तपासणीसाठी पुरेसा वेळ आवश्यक असताना तो मिळत नसल्याचा दावा.
एका विश्लेषकाकडून दरमहा मर्यादित नमुने तपासले जाऊ शकतात; मात्र त्यापेक्षा जास्त नमुने तपासण्याचा दबाव असल्याचा आरोप.
दोन शिफ्ट सुरू करण्यापूर्वी प्रयोगशाळेची क्षमता, उपकरणे आणि मनुष्यबळ वाढविण्याची मागणी.
पूर्ववत कार्यालयीन वेळ लागू करावी आणि दोन शिफ्टचा निर्णय रद्द करावा, अशी प्रमुख मागणी.
अतिरिक्त कामासाठी योग्य भत्ते व सुविधा देण्याची मागणी.
सतत बदलणारे आदेश आणि कार्यालयीन वेळांमुळे कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाल्याचा आरोप.
प्रयोगशाळेतील विश्लेषणाच्या गुणवत्तेशी तडजोड होऊ नये, यासाठी घाईगडबडीत नमुने निकाली काढू नयेत, अशी मागणी.
तुकाराम मुंढेंना डबल धक्का, अन्न व औषध प्रशासनाच्या कारवाईच्या पद्धतीव मुंबई उच्च न्यायालयाचे प्रश्नचिन्ह- (Mumbai High Court On FDA Tukaram Mundhe)
एकीकडे तुकाराम मुंढे यांच्या कार्यपद्धतीवर तब्बल २९ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आक्षेप घेतला आहे. तर दुसरीकडे मुंबई उच्च न्यायालयाने अन्न व औषध प्रशासनाच्या कारवाईच्या पद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. केवळ खासगी आस्थापनांवर कठोर कारवाई न करता सरकारी आणि मंत्र्यांच्या मालकीच्या आस्थापनांचीही तपासणी करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले. मंत्रालय, उच्च न्यायालय तसेच सरकारी आणि निमसरकारी आस्थापनांमधील कँटिनचीही तातडीने पाहणी करून शुक्रवारी अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नवी मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलचा अन्न परवाना रद्द करण्याच्या निर्णयाविरोधातील याचिकेवरील सुनावणीदरम्यान न्यायालयाने हे निरीक्षण नोंदवले. केवळ एक-दोन झुरळे आढळल्यामुळे थेट परवाना रद्द करणे योग्य नसल्याचे न्यायालयाने नमूद केले.

तुकाराम मुंढेंनी २५ मे रोजी स्वीकारला होता पदभार- (Tukaram Mundhe News)
गेल्या काही काळापासून अन्न आणि औषध प्रशासन खात भ्रष्टाचाराच्या आरोपावरून चर्चेत आले होते. लाचखोरी आणि इतर भ्रष्ट कामांमुळे चर्चेत असलेल्या अन्न आणि औषध प्रशासनात आता आयुक्त म्हणून तुकाराम मुंढेंची बदली करण्यात आली आहे. तसा आदेश राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने जारी केला होता. त्यानुसार 25 मे रोजी तुकाराम मुंढे हे अन्न आणि औषध प्रशासनाच्या आयुक्त पदाचा पदभार स्वीकारला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here