Home मुख्य बातम्या पुरुषांची छेडछाड करणाऱ्या ‘लेडी गँग’ ला अटक

पुरुषांची छेडछाड करणाऱ्या ‘लेडी गँग’ ला अटक

6
0

वाराणसी, दि. २८ : पुरुषांची छेडछाड करणाऱ्या, त्यांच्यावर अश्लील शेरबाजी करणाऱ्या, त्यांना पाहून अश्लील हवाभाव करणाऱ्या महिलांच्या टोळीला उत्तर प्रदेश पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. रोजच्या या छळाला कंटाळून काही जणं दुसर्‍या मार्गाने यायचे. पण तिथे सुद्धा महिला गँगची दहशत निर्माण झाली होती. काही पुरुषांनी या छळाला कंटाळून पोलिसांकडे तक्रार केली. सापळा लावून पोलिसांनी ही लेडी गँग ताब्यात घेतली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, लेडी गँगच्या दोन महिला सार्वजिनकरित्या पुरूषांवर अश्लील शेरेबाजी करत. त्यांची छेडछाड करत. त्या सार्वजनिक वातावरण खराब करत असल्याने तक्रार आली होती. वाराणसी पोलीस आयुक्तांनी या लेडी गँगचा शोध घेण्याचे निर्देश दिले. तेव्हा स्टेशन बाहेर दोन महिला अश्लील इशारे करताना पकडल्या गेल्या. या महिला रोज प्रवाशांना नाहक त्रास देत असल्याचे समोर आले. या महिलांविरोधात अनेक दुकानदारांनी, रिक्षा चालकांनी आणि इतर प्रवाशांनी पोलिसांना सूचना दिली होती.

त्या महिला गर्दीचा फायदा घेत पुरूषांना टोमणे मारत, त्यांना मुद्दाम त्रास देत. अनेक पुरूषांच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर महिला पोलिसांनी शहरातील दोन ते तीन ठिकाणी सापळा लावला होता. वाराणशी स्टेशनबाहेर अशा महिला उभ्या असल्याचे समोर आले. पोलिसांना सूचना मिळताच. दोन महिलांना पकडण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here