Home मुंबई *सातार्‍यात शनिवारी जनसेवा सप्ताहासह* *हरित महाराष्ट्र-समृद्ध महाराष्ट्र कार्यक्रम*

*सातार्‍यात शनिवारी जनसेवा सप्ताहासह* *हरित महाराष्ट्र-समृद्ध महाराष्ट्र कार्यक्रम*

23
0

मुंबई – स्व. अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त ‘जनसेवा सप्ताह’ व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त ‘हरित महाराष्ट्र-समृद्ध महाराष्ट्र’ या कार्यक्रमाचे शनिवार दिनांक २५ जुलै, २०२६ रोजी सकाळी १० वाजता सातारा जिल्ह्यातील श्री वनलक्ष्मी कृषी पर्यटन केंद्र ‘आपलं गाव’ मु. पो. बेलदरे, ता. कराड येथे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुंबई बँकेचे अध्यक्ष आ. प्रवीण दरेकर असणार आहेत.

या कार्यक्रमाद्वारे ३ हजार फळझाडे व देशी वृक्षांचे वृक्षारोपण, पर्यावरण संरक्षणाची सामूहिक शपथ, सेंद्रिय व नैसर्गिक शेती विषयक मार्गदर्शन, औषधी व फळझाडांच्या रोपांचे वितरण, हरिपाठ व आषाढी एकादशीनिमित्त विशेष कार्यक्रम, जलसंवर्धन व मृदू संवर्धन जनजागृती असे प्रमुख उपक्रम राबविण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला कराड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रताप पाटील, कराड पशुसंवर्धनचे सहाय्यक आयुक्त डॉ. एन. डी. पवार, पाटण पशुसंवर्धनचे सहाय्यक आयुक्त डॉ. एम. बी. चव्हाण, कराड तालुका कृषी अधिकारी प्रशांत शेंडे हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तर मुंबई बँकेचे उपाध्यक्ष सिद्धार्थ कांबळे, मुंबई बँकेचे ज्येष्ठ संचालक शिवाजीराव नलावडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस संजय तटकरे, प्रदेश उपाध्यक्ष संतोष धुवाळी, मुंबई बँकेचे संचालक पुरुषोत्तम दळवी, नितीन बनकर, आनंदराव गोळे, विष्णू घुमरे, अनिल गजरे, मुंबई बँकेच्या संचालिका जयश्री पांचाळ, कविता देशमुख, शिल्पा सरपोतदार, कराड पशुचिकित्सा व्यवसायी संघटनेचे अध्यक्ष सतिश पाटील, सातारा पशुचिकित्सा व्यवसायी संघटनेचे अध्यक्ष डॉ. विलास पाटील यांची प्रमुख उपस्थिती असणार असल्याची कार्यक्रमाचे आयोजक व श्री वनलक्ष्मी कृषी विकास प्रतिष्ठान ( नंदलाल गोशाळा) चे मुख्य विश्वस्त नंदकुमार काटकर यांनी दिली.

00000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here