Home मुंबई स्वर्गीय अजितदादांच्या जयंतीचा समावेश शासकीय कार्यालयामधील जयंती कार्यक्रमांच्या सूचीमध्ये नव्याने करा ;ज्येष्ठ...

स्वर्गीय अजितदादांच्या जयंतीचा समावेश शासकीय कार्यालयामधील जयंती कार्यक्रमांच्या सूचीमध्ये नव्याने करा ;ज्येष्ठ नेते छगन भुजबळ आणि हसन मुश्रीफ यांची निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्यांकडे मागणी

23
0

मुंबई दि. १४ जुलै – स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या २२ जुलै या जयंतीचा समावेश शासकीय कार्यालयामध्ये आयोजित करावयाच्या राष्ट्रपुरुष, थोर व्यक्ती, यांच्या जयंती कार्यक्रमाच्या सूचीमध्ये नव्याने करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ आणि ज्येष्ठ नेते व वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे आज केली.

तत्कालीन उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांचे महाराष्ट्राच्या सामाजिक, राजकीय आणि विकासात्मक जडणघडणीत अत्यंत मोलाचे योगदान राहिले आहे. दादांनी जनमानसासाठी केलेले कार्य आणि राज्याच्या प्रगतीमधील त्यांची महत्वपूर्ण भूमिका विचारात घेता सन २०२६ मधील शासकीय जयंती कार्यक्रमाच्या सूचीमध्ये २२ जुलै हा दादांच्या जयंतीचा नव्याने समावेश करणे आवश्यक आहे. यासंदर्भात आवश्यक सुधारीत परिपत्रक निर्गमित करून राज्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, शाळा व महाविद्यालयांना तात्काळ अवगत करण्याबाबत योग्य ती कार्यवाही करावी अशी विनंती निवेदनात करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here