Home मुंबई *अतिरिक्त महानगरपालिका आयुक्तांनी बा. य. ल. नायर रुग्णालयाची केली पाहणी*

*अतिरिक्त महानगरपालिका आयुक्तांनी बा. य. ल. नायर रुग्णालयाची केली पाहणी*

33
0

*अतिरिक्त महानगरपालिका आयुक्तांनी बा. य. ल. नायर रुग्णालयाची केली पाहणी

*बा.य.ल रूग्णालयात सुरू असणाऱ्या पायाभूत सुविधा विकास कामांना अधिक वेग देण्याचे निर्देश*

‘मुंबई सेंट्रल’ परिसरात असणाऱ्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या बा. य. ल. नायर धर्मार्थ रुग्णालयाची अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) प्राजक्ता वर्मा लवंगारे यांनी आज (दिनांक ९ जुलै २०२६) भेट देऊन पाहणी केली. तसेच रूग्णालयातील पायाभूत सुविधा विकास कामांना अधिक गती देण्याचे निर्देशही त्यांनी याप्रसंगी दिले.

यावेळी संचालक (वैद्यकीय शिक्षण व प्रमुख रूग्णालये) तथा बा. य. ल नायर धर्मार्थ रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. शैलेश मोहिते, आरोग्य पायाभूत सुविधा कक्षाचे उप प्रमुख अभियंता आणि रुग्णालयातील विविध विभागांचे प्रमुख यांच्यासह बृहन्मुंबई महानगरपालिकेचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.

प्राजक्ता लवंगारे यांनी रूग्णालयातील अतिदक्षता विभागात परिचारिका व परिसेविका यांच्याशी संवाद साधला. तसेच रुग्णालयातील उपलब्ध औषध सामग्रीच्या उपलब्धततेचा आढावा घेतला. अतिदक्षता विभाग, वैद्यकीय विभाग, बाल रुग्ण विभाग, महिला रुग्ण कक्ष, नव्याने उभारण्यात येणाऱ्या कर्करोग आजारासाठीच्या विशेष इमारतीच्या कामांचीही त्यांनी यावेळी पाहणी केली.

रूग्णालयातील महिला कक्षातील स्वच्छतागृहाची पाहणी करत अधिक चांगल्या प्रकारे व नियमितपणे स्वच्छता करावी, असे निर्देश त्यांनी दिले. आरोग्य पायाभूत सुविधा कक्षामार्फत रूग्णालयात सुरू असलेली विविध स्तरीय कामे अधिक जलद गतीने पूर्ण करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

बा.य.ल. नायर रूग्णालयात रुग्ण नोंदणीपासून ते रुग्णालयातून डिस्चार्ज होईपर्यंतची सर्व प्रक्रिया त्यांनी जाणून घेतली. तसेच रुग्णालयाच्या दैनंदिन कामकाजात येणाऱ्या अडचणींची माहितीही त्यांनी संबंधितांशी संवाद साधून घेतली. रूग्णालयात कार्यरत विविध विभाग प्रमुखांच्या कामाचा आढावा घेऊन त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्याचे निर्देश त्यांनी आजच्या आकस्मिक पाहणी दरम्यान रूग्णालयाच्या अधिष्ठात्यांना दिले.
===

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here