Home मुंबई परळ, भोईवाडा बेस्ट कामगार वसाहतीतील नागरी समस्यांबाबत संयुक्त बैठक संपन्न

परळ, भोईवाडा बेस्ट कामगार वसाहतीतील नागरी समस्यांबाबत संयुक्त बैठक संपन्न

40
0

मुंबई, दि. ३ जुलै २०२६ : परळ, भोईवाडा येथील बेस्ट कामगार वसाहतीतील पाणीपुरवठा, सिव्हरेज लाईन, पंप, सिव्हिल दुरुस्ती, विद्युत वायरिंग आदी विषयांवर आज बेस्ट समिती अध्यक्षा सौ. तृष्णा विश्वासराव यांच्या अध्यक्षतेखाली संयुक्त बैठक पार पडली.
बैठकीत अध्यक्षा महोदया यांनी पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईन, सिव्हरेज लाईन व पंपांच्या कामांना प्रथम प्राधान्य देण्याचे निर्देश दिले. तसेच आवश्यक सिव्हिल कामे टप्प्याटप्प्याने व प्राधान्यक्रमानुसार पूर्ण करण्यात येतील, असे सांगितले.
या बैठकीस माजी महापौर सौ. श्रद्धा जाधव, वसाहतीतील अलोटीज असोसिएशनचे पदाधिकारी तसेच बेस्ट उपक्रमाचे
संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here