Home मुंबई *कॉटनग्रीन, रे रोड, शिवडी अग्निशमन केंद्र परिसरात महापौर श्रीमती रितू तावडे यांच्याकडून...

*कॉटनग्रीन, रे रोड, शिवडी अग्निशमन केंद्र परिसरात महापौर श्रीमती रितू तावडे यांच्याकडून भर पावसात पाहणी; पाणी निचरा आणि मॅनहोल सुरक्षिततेसाठी योग्य उपाययोजना करण्याचे मुंबई पोर्ट ट्रस्टला निर्देश*

48
0

मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे यांनी कॉटनग्रीन रेल्वे स्थानक, रे रोड, शिवडी अग्निशमन केंद्र परिसराची आज (दिनांक ३ जुलै २०२६) प्रत्यक्ष पाहणी केली.

या पाहणीदरम्यान मुंबई पोर्ट ट्रस्ट (मुंबई पत्तन प्राधिकरण – MbPT) च्या हद्दीत नागरी सखल भागात पाणी साचले असल्याचे आणि त्याचा निचरा होत नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर महापौरांनी नाराजी व्यक्त केली. तसेच, संबंधित यंत्रणेला तातडीने पाणी उपसा करणारे पंप लावण्यासह आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. परिसरात पाणी साचले असूनही मुंबई पोर्ट ट्रस्टने पाणी उपसा करण्यासाठी एकही पंप लावला नव्हता, हे लक्षात घेता तात्काळ आवश्यक क्षमतेचे पंप तैनात करण्याचे निर्देश महापौरांनी दिले.

त्याचप्रमाणे, कॉटनग्रीन रेल्वे स्थानकाजवळ पुलाखाली भर पावसात मॅनहोल खुले करून तिथे काम सुरू होते. तिथे कोणतेही बॅरिकेड्स नव्हते आणि अभियंता किंवा अधिकारी तिथे उपस्थित नव्हते. महापौर श्रीमती रितू तावडे यांनी स्वतः तिथेच थांबून नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने बॅरिकेडिंग करण्याचे आदेश दिले. प्राधिकरणाच्या हद्दीतील सर्व मॅनहोल प्राधिकरणाने तपासावेत, ते सुस्थितीत असल्याची खात्री करावी, अशी सूचना महापौरांनी केली आहे.

दरम्यान, पावसाळ्यातील उपाययोजना, सार्वजनिक स्वच्छता तसेच इतर नागरी विषयांबाबत मुंबई पोर्ट ट्रस्ट आणि महानगरपालिका प्रशासन यांच्यातील समन्वयासाठी लवकरच एक संयुक्त बैठक घेणार असल्याचे महापौरांनी यावेळी स्पष्ट केले.
***

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here