Home पुणे * *पुणे जिल्हा रहिवाशी सेवा संघ, मुंबई आयोजित विद्यार्थी गुणगौरव कौतुक सोहळा*

* *पुणे जिल्हा रहिवाशी सेवा संघ, मुंबई आयोजित विद्यार्थी गुणगौरव कौतुक सोहळा*

37
0

रविवार दिनांक ५ जुलै २०२६ रोजी सकाळी १० वाजता, छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिर येथे संपन्न होणार आहे. १० वी व १२ वी परीक्षेत पहिल्या तीन क्रमांकांना रोख रक्कम, सन्मानचिन्ह आणि चांदीचे नाणे पारितोषिक असून ७०% हून अधिक गुण प्राप्त विद्यार्थ्यांना पेन ड्राईव्ह देण्यात येणार आहे. तसेच ५ वी ते १२ वी च्या विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात येणार आहे.

*सदर कार्यक्रम हा पुणे जिल्ह्यातील रहिवाशी जे मुंबई मध्ये राहतात त्या विद्यार्थ्यांसाठी असेल, याची नोंद घ्यावी.*

माजी सहाय्यक पोलीस आयुक्त ॲड धनराज वंजारी, किर्तनकार ह. भ. प. नीलमताई पोतले वडघुले, सिनेट सदस्य किसन सावंत हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत.

पुणे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी.

आपला नम्र
*भरत अलका दत्तात्रय शिंदे*
*-संचालक*
*पुणे जिल्हा रहिवाशी सेवा संघ*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here