Home मुंबई ठाकरेंचा पक्ष फोडणाऱ्या एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; सचिन अहिरांच्या उमेदवारीने पक्षात उभी...

ठाकरेंचा पक्ष फोडणाऱ्या एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; सचिन अहिरांच्या उमेदवारीने पक्षात उभी फूट ?

40
0

ठाकरे गटातून आलेले माजी आमदार सचिन अहिर यांनी उपसभापतीपदासाठी अचानक उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे पक्षात उभी फूट पडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
>
ठाकरेंचा पक्ष फोडणाऱ्या एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; सचिन अहिरांच्या उमेदवारीने पक्षात उभी फूट
: ठाकरे गटातून आलेले माजी आमदार सचिन अहिर यांनी उपसभापतीपदासाठी अचानक उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे पक्षात उभी फूट पडल्याची चर्चा राजकीय
: ठाकरेंचा पक्ष फोडणाऱ्या एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; सचिन अहिरांच्या उमेदवारीने पक्षात उभी फुट पडली आहे.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील सहा खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर “ऑपरेशन टायगर”ची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. त्यानंतर आता ठाकरे गटाचे माजी नेते सचिन अहिर यांनीही शिंदेसेनेची वाट धरत विधान परिषद उपसभापतीपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे. मात्र, या निर्णयामुळे शिंदेसेनेतील काही वरिष्ठ नेत्यांमध्ये नाराजी असल्याची चर्चा रंगली आहे.
सचिन अहिरांच्या उमेदवारीने अंतर्गत नाराजी?

विधान परिषद उपसभापतीपदासाठी शिंदेसेनेकडून सचिन अहिर यांना उमेदवारी दिल्यानंतर निलम गोऱ्हे आणि कृपाल तुमाने हे नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. या दोन्ही नेत्यांची नावे या पदासाठी संभाव्य दावेदार म्हणून चर्चेत होती. त्यामुळे अचानक सचिन अहिर यांना संधी मिळाल्याने पक्षात अंतर्गत खळबळ उडाल्याचे बोलले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here