Home Trending Now *SIR 2026: २००२ च्या मतदार यादीत नाव नसेल तर घाबरू नका, ‘हे’...

*SIR 2026: २००२ च्या मतदार यादीत नाव नसेल तर घाबरू नका, ‘हे’ १२ कागदपत्रे चालणार; विवाहित महिलांसाठी विशेष नियम*

144
0

*SIR 2026: २००२ च्या मतदार यादीत नाव नसेल तर घाबरू नका, ‘हे’ १२ कागदपत्रे चालणार; विवाहित महिलांसाठी विशेष नियम*

*उपशीर्षक:*
३० जून ते २९ जुलै २०२७ दरम्यान BLO घरी येणार, जन्मतारखेनुसार कागदपत्रांची यादी जाहीर

मुंबई, (शीतल हरीश करदेकर)
महाराष्ट्रात मतदार यादीच्या विशेष पुनरीक्षणाची *SIR (Special Intensive Revision) २०२७* प्रक्रिया ३० जूनपासून सुरू झाली आहे. २९ जुलैपर्यंत बूथ लेव्हल ऑफिसर (BLO) घरोघरी जाऊन गणना अर्ज देणार आहेत. मात्र अनेकांच्या मनात प्रश्न आहे – *२००२ च्या मतदार यादीत नाव नसेल तर काय?

निवडणूक आयोगाने याबाबत स्पष्ट सूचना दिल्या आहेत.

*१. नाव नसेल तर ‘असा’ शोधा वंशवेल:*
तुमचे नाव २००२ च्या यादीत नसल्यास घाबरून जाण्याची गरज नाही. खालील क्रमाने पुरावा द्या:
१. *स्वतःचे नाव* – २००२यादी, भाग क्रमांक + अनुक्रमांक
२. *नसल्यास आई-वडिलांचे नाव – त्यांचा २००२ चा तपशील
३. *तेही नसल्यास आजी-आजोबा* – फक्त वडिलांचे आई-वडील
४. *तेही नसल्यास* – जन्म दाखला, पासपोर्ट किंवा १०वीचे प्रमाणपत्र यापैकी एक

*२. जन्मतारखेनुसार कागदपत्रे बदलणार:*
जन्मतारीख काय द्यायचं?
*०१.०७.१९८७ पूर्वी*-फक्त स्वतःचा जन्मतारीख/जन्मस्थान पुरावा
*०१.०७.१९८७ ते ०२.१२.२००४* स्वतःचा + आई *किंवा* वडिलांचा पुरावा
*०२.१२.२००४ नंतर* स्वतःचा + आई + वडील तिघांचा पुरावा
*३. विवाहित महिलांसाठी ‘डबल’ पुरावा लागणार:*
ज्या महिलांचे लग्नानंतर नाव बदलले किंवा २००२ मध्ये नाव नव्हते, त्यांनी दोन गोष्टी द्यायच्या:
१. *माहेरच्या गावातील* स्वतःचे/आई-वडील/आजी-आजोबा यांचा २००२ चा मतदार यादीतील पुरावा
२. *+ विवाह नोंदणी प्रमाणपत्र* अनिवार्य

*३. हे 12 कागदपत्रे चालणार – आधारसह:*
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आधार कार्ड ग्राह्य धरले जाणार आहे. याशिवाय जन्म दाखला, पासपोर्ट, १०वी प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, जात प्रमाणपत्र, सरकारी ओळखपत्र, कुटुंब नोंदी, जमीन वाटप प्रमाणपत्र, वन हक्क प्रमाणपत्र, NRC पुरावा आणि १९८७ पूर्वीचा बँक/पोस्ट ओळखपत्र चालेल.

*BLO ला सहकार्य करा, हे तयार ठेवा:*
निवडणूक अधिकाऱ्यांनी आवाहन केले आहे की, नागरिकांनी पासपोर्ट साईज फोटो, मोबाईल नंबर आणि वरील कागदपत्रे तयार ठेवावीत. *”कोणताही पात्र मतदार वगळला जाणार नाही आणि अपात्र व्यक्ती समाविष्ट होणार नाही”* याची दक्षता घेतली जाणार आहे.

*तपासणीसाठी:* http://voters.eci.gov.in | *App:* ECI NET | *हेल्पलाइन:* 1800 22 1950

*बॉक्स: लक्षात ठेवा*
१. BLO कडून मिळणारा अर्ज भरून एक प्रत परत घ्या
२. २००२ यादी http://voters.eci.gov.in वर आधीच तपासून ठेवा
३. चुकीची माहिती देऊ नका – मूळ

“अफवा: 2002 यादीत नाव नसेल तर मतदार यादीतून नाव कट” vs “वास्तव काय आहे?: पालकांचे पुरावे + १२ कागदपत्रे पर्याय उपलब्ध”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here