Home उद्योग / शिक्षण वार्ता नागपूरचे नवनियुक्त पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS)...

नागपूरचे नवनियुक्त पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) एका जाहीर कार्यक्रमात उपस्थित राहून संघाच्या शिस्तीचे आणि विचारसरणीचे कौतुक केले

45
0

नागपूरचे नवनियुक्त पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) एका जाहीर कार्यक्रमात उपस्थित राहून संघाच्या शिस्तीचे आणि विचारसरणीचे कौतुक केले होते. यावरून आधीच विरोधी पक्षांनी आक्षेप घेतला असताना, आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अत्यंत आक्रमक पवित्रा घेत नांगरे पाटलांवर थेट शब्दांत प्रहार केला आहे. राज ठाकरे यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याला प्रशासकीय नियमांची आठवण करून देत, खाकी वर्दीत असताना कोणत्याही एका संघटनेबद्दल किंवा पक्षाबद्दल उघडपणे निष्ठा दाखवणे चुकीचे असल्याचे म्हटले आहे.राज ठाकरे यांनी नांगरे पाटलांना थेट आव्हान देत म्हटले की, “जर तुम्हाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दल आणि त्यांच्या विचारसरणीबद्दल इतकीच आपुलकी, प्रेम आणि आदर असेल, तर आधी आपल्या पोलीस सेवेचा अधिकृतपणे राजीनामा द्या. त्यानंतर खुशाल जाऊन संघात किंवा भाजपमध्ये अधिकृतपणे सामील व्हा.” एका बाजूला कायद्याचे रक्षण करणारी खाकी वर्दी अंगावर असणे आणि दुसऱ्या बाजूला जाहीर मंचावरून राजकीय-वैचारिक संघटनांचे गौरवगान करणे ही दुहेरी भूमिका लोकशाहीला आणि प्रशासकीय व्यवस्थेला मारक आहे, असा स्पष्ट टोला राज ठाकरेंनी लगावला आहे.

Thackeray, Vishwas Nangare Patil, RSS, Nagpur Police Commissioner, Maharashtra Politics, MNS, BJP, Police Administration, Political Controversy, Maharashtra News

#navakal #navakalnews #rajthackeray #vishwasnangarepatil #rss

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here