हा फोटो कोरोना काळातील आहे. ‘रस्त्यावर कलाकार, लक्ष द्या सरकार’ चा फलक घेऊन उभे असलेले रंगकर्मी. चेहऱ्यावर एकच सवाल – आमचे काय?
*कोरोना काळातील आंदोलन*
दोन महिने नाट्यगृहे बंद. रंगकर्मींच्या घरात चूल पेटत नव्हती. लाईटमन, साऊंडवाले, नेपथ्यकार, वेशभूषाकार, प्रॉम्प्टर, स्टेज मॅनेजर, छोटे कलाकार – सगळे उपाशी. तेव्हा संपूर्ण महाराष्ट्रातील रंगकर्मी रस्त्यावर उतरले.
मागणी एकच – माथाडी महामंडळाच्या धर्तीवर ‘रंगकर्मी कल्याण महामंडळ’ स्थापन करा. सर्व रंगकर्मींची नोंदणी करा. सामाजिक सुरक्षा, पेन्शन, वैद्यकीय सुविधा द्या. नाट्य क्षेत्राला उद्योगाचा दर्जा द्या.
*सरकारने आश्वासन दिले, पण…*
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांनी बैठक घेतली. महामंडळाचे काम सुरू झाले.
मग सरकार बदलले. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. त्यांनी पत्रकार महामंडळाचे आश्वासन दिले. पत्रकार कल्याणकारी महामंडळ मंत्रीमंडळात मंजूर झाले, पण नंतर रंगकर्मी महामंडळ गायब झाले.
आणि २०२४ ला मंजुर झालेले पत्रकार कल्याणारी महामंडळ तर हवेत उडाले.
दोन्ही वेळेस मुख्यमंत्री शिवसेनेचे होते.
*आजचा प्रश्न: महामंडळ गेले कुठे?*
४ वर्षे जास्त झाली, हजारो रंगकर्मी वाट पाहत आहेत. फाईल कुठे अडकली?
*निर्मात्यांची बाजू: खर्चाचा डोंगर*
1990 ला एका नाटकाचा प्रयोग 20 हजारात व्हायचा. आज तोच खर्च 1.5 ते 1.75 लाख. नाट्यगृह भाडे, मानधन, नेपथ्य, प्रकाश, संगीत, जाहिरात, GST… सगळे मिळून दीड लाख.
50 पैकी 40 नाटके तोट्यात जातात. निर्माता रिस्क घेतो, घर-जमीन विकायची वेळ येते. तिकीट दरवाढ केली नाही तर निर्माता मरतो, दरवाढ केली तर प्रेक्षक पाठ फिरवतो.
*उपाय काय?*
1. महामंडळ तात्काळ स्थापन करा. निर्मात्यांपासून बॅकस्टेज कामगारांपर्यंत सर्वांची नोंद करा.
2. *नाट्य क्षेत्राला उद्योगाचा दर्जा द्या.* बँक कर्ज, विमा, वीज-करात सवलत, सबसिडी मिळेल. ज्या प्रमाणे शेती व्यवसायास कर्ज माफी हा प्रभावी उपाय नाही, त्याचप्रमाणे रंगभूमीला तात्पुरती मदत नको, कायमस्वरूपी धोरण हवे.
3. सहायता निधी उभा करा. कॉर्पोरेट CSR, मोठे निर्माते, चॅनल्स, कलाकार यांच्याकडून ठराविक भाग महामंडळाला द्या.
4. सांस्कृतिक धोरण बदला. *निर्मितीपासून बाजारापर्यंत* – तालीम जागा, नेपथ्य, जाहिरात, तिकीट विक्री – प्रत्येक टप्प्यावर संरक्षण द्या.
5. नाट्यगृह भाडे, GST कमी करा.
*या लढ्यात पत्रकारांनी दिली साथ*
कोरोना काळात जय महाराष्ट्र चॅनलसह अनेक पत्रकारांनी आवाज सरकारपर्यंत पोहोचवला. त्यामुळे 5 महिन्यांचे रखडलेले वेतन मिळाले. नंतरही अनेकांनी मदत केली. पण रंगकर्मींवर अशी वेळ पुन्हा येताच कामा नये. महामंडळ आणि उद्योगाचा दर्जा हाच एकमेव उपाय आहे.
*शेवटचा इशारा*
फोटोतील हा आक्रोश पुन्हा रस्त्यावर येऊ देऊ नका. सामान्य रंगकर्मी असहाय असतो आणि महामंडळ हे त्याचे आशास्थान आहे.
सरकार, डोळे आणि बुद्धी जागी ठेवा. *कारण रंगकर्मी जगला तरच नाटक जगेल. रंगकर्मी सन्मानाने जगला तरच रंगभूमी बहरेल.*
*- शीतल हरीश करदेकर*
वाचा पूर्ण लेख: https://maimedia24.com/20739/
#रंगकर्मी_महामंडळ #मराठी_रंगभूमी #नाटक #RangakarmiMahamandal #MarathiTheatre #Maharashtra #SaveTheatre #उद्योगाचा_दर्जा
Mai Media 24 Uddhav Thackeray
Eknath Shinde – एकनाथ संभाजी शिंदे
Hasan Mushrif Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार
#amitdeshmukh
@highlight
—



















