छत्रपती संभाजीनगर जिल्हा बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अंबादास दानवे यांनी महायुतीला पाठिंबा दिल्याने उद्धव ठाकरे गटाला मोठा राजकीय धक्का मानला जात आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी घेतलेल्या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. महाविकास आघाडीचे स्वतंत्र पॅनल असतानाही दानवे यांनी महायुतीच्या पॅनलमधून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतल्याने चर्चेला उधाण आले आहे.


















