Home मुंबई *तरुणांना नोकरीची सुवर्ण संधी*

*तरुणांना नोकरीची सुवर्ण संधी*

41
0

*खासदार रविंद्र वायकर यांच्या पुढाकाराने मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा क्षेत्रात २३ जून रोजी भव्य रोजगार मेळावा*

– जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र (मुंबई उपनगर) आणि पंडीत दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा यांचे सहकार्याने
– मेळाव्यात ४० पेक्षा जास्त कंपन्यांचा सहभाग
– ईस्माईल युसुफ महाविद्यालयात सकाळी १० ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत मेळाव्याचे आयोजन
– कॉर्पोरेट हाउसेस आणि उद्योग भाग घेणार आहेत. बँकिंग, आयटी, रिटेल, हॉटेल मॅनेजमेंट, मॅन्युफॅक्चरिंग, सेल्स आणि सर्व्हिस सेक्टर मधील शेकडो रिक्त पदांसाठी या मेळाव्यात थेट मुलाखती
– १० वी आणि १२ वी उत्तीर्ण/अनुत्तीर्ण, आयटीआय (ITI) आणि डिप्लोमा धारक, आरोग्य, पदवीधर, पदव्युत्तर, आयटी तसेच तांत्रिक शिक्षण घेतलेल्या उमेदवारांना हि नोकरीची संधी

*मुंबई :*

मुंबई उपनगरातील सुशिक्षित बेरोजगार तरुण-तरुणींना हक्काच्या रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र (मुंबई उपनगर) आणि पंडीत दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा यांच्या सहकार्याने एका भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा क्षेत्राचे खासदार रवींद्र वायकर यांच्या विशेष पुढाकाराने आणि प्रयत्नाने हा मेळावा मंगळवार, २३ जून २०२६ रोजी जोगेश्वरी येथील नामांकित इस्माईल युसूफ महाविद्यालयात सकाळी १० ते सायंकाळी ४ या वेळात पार पडणार आहे.

या मेळाव्यात मुंबई आणि परिसरातील विविध क्षेत्रांतील नामांकित कंपन्या, (बीएफएसआय, आयटीईएस. महिंद्रा आणि महिंद्रा प्रा.लि., अव्हेन्यू सुपर मार्केट, आदी.) कॉर्पोरेट हाउसेस आणि उद्योग भाग घेणार आहेत. बँकिंग, आयटी, रिटेल, हॉटेल मॅनेजमेंट, मॅन्युफॅक्चरिंग, सेल्स आणि सर्व्हिस सेक्टर मधील शेकडो रिक्त पदांसाठी या मेळाव्यात थेट मुलाखती घेतल्या जातील. पात्र उमेदवारांची जागेवरच प्राथमिक निवड केली जाणार असल्याने तरुणांसाठी ही एक उत्तम संधी ठरणार आहे.

या रोजगार मेळाव्याचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये सर्व प्रकारच्या शैक्षणिक पात्रता असलेल्या उमेदवारांना संधी उपलब्ध असेल. यात १० वी आणि १२ वी उत्तीर्ण/अनुत्तीर्ण, आयटीआय आणि डिप्लोमा धारक, पदवीधर, पदव्युत्तर आणि तांत्रिक शिक्षण घेतलेले उमेदवार या मेळाव्यात सहभागी होऊ शकतील.

मेळाव्यात मोफत प्रशिक्षण व विद्यावेतन योजने अंतर्गत मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना, प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना, आर्थिक विकास महामंडळ, जिल्हा उद्योग केंद्रामार्फत स्वयंरोजगाराच्या संधीचा लाभ घेता येणार आहे. इच्छुकांनी आपल्यासोबत बायोडेटाच्या किमान ४ ते ५ प्रती, शैक्षणिक कागदपत्रे आणि आधार कार्ड आणणे आवश्यक आहे. या भव्य रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून “तरुणांच्या हाताला काम देणे ही आपली प्राथमिकता आहे. या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून मुंबई उपनगरातील शेकडो तरुणांना एकाच छताखाली नामांकित कंपन्यांमध्ये रोजगाराची संधी मिळणार आहे. अधिकाधिक तरुण-तरुणींनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा.” असे आवाहन खासदार रविंद्र वायकर यांनी केले आहे.न

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here