Home मुंबई *विक्रोळीतील नाले स्वच्छता, परिसर स्वच्छता, रस्ते विकास कामांचा उप महापौर श्री. संजय...

*विक्रोळीतील नाले स्वच्छता, परिसर स्वच्छता, रस्ते विकास कामांचा उप महापौर श्री. संजय घाडी घेतला आढावा*

6
0

मुंबईचे उप महापौर श्री. संजय घाडी यांनी आज (दिनांक १७ जून २०२६) विक्रोळी परिसरातील नाले स्वच्छता, परिसर स्वच्छता, रस्ते विकास कामांची पाहणी करत आढावा घेतला.

त्यात साईनगर येथील रस्ते काम, भारतनगर येथे नाल्यावर बांधलेला पूल, स्वर्गीय परेश पारकर मार्ग काँक्रिट रस्ता, सिद्धिविनायक मंदिर, जैन मंदिर व बुऱ्हानी बालवाडी येथील सार्वजनिक स्वच्छता, मशीद नाला, हरियाली नाल्याची स्वच्छता, राजीव गांधीनगर येथे महानगरपालिकेच्या प्रस्तावित रुग्णालयाच्या जागा, विक्रोळी-जोगेश्वरी जोडरस्ता आणि वाल्मिकीनगर झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पातील जोड रस्त्याच्या कामांचा समावेश आहे.

या पाहणी दौऱ्यात स्थानिक नगरसेवक श्री.राजेश सोनावळे, उप आयुक्त (परिमंडळ ६) श्री संतोषकुमार धोंडे, एस विभागाच्या सहायक आयुक्त श्रीमती समरीन सय्यद तसेच संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

विक्रोळी – साईनगर येथील रस्ते काम प्रगतिपथावर आहे. रस्त्याचे काँक्रिटीकरण करून ते हस्तांतरित करावे, असे उप महापौर श्री. संजय घाडी यांनी सांगितले. विघ्नहर झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पातील स्थानिक रहिवाशांनी उप महापौर श्री. घाडी यांच्याशी संवाद साधला. विघ्नहर झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प ठिकाणी नागरिकांच्या येण्या-जाण्यासाठी रस्त्याची सोय करावी. त्याबाबतचा प्रस्ताव सादर करावा. मोकळ्या जागेवर उद्यान विकसित करावे. दिवाबत्तीची सोय करावी, अशा विविध सूचना श्री. घाडी यांनी केल्या.

विक्रोळी-जोगेश्वरी जोड रस्त्यावरील-वाल्मिकीनगर झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पातील रस्ते कामाची पाहणी केली. संतोषी माता रस्ता ते नाल्यापर्यंतचा रस्ते विकास महानगरपालिकेच्या मानांकनानुसार करण्यात आला आहे. याप्रकरणी म्हाडा अधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्याची सूचना उपमहापौर श्री. घाडी यांनी केली.

यानंतर उप महापौर श्री. घाडी यांनी भारतनगर नाल्यावर बांधलेल्या पादचारी पुलाची पाहणी केली. नाल्याच्या मुखावर जाळी बसवावी व नाल्यातील काचाऱ्यास प्रतिबंध करावा. मशीद नाल्यात साचणारा तरंगता कचरा सातत्याने काढावा, अशा सूचना उप महापौर श्री. घाडी यांनी केल्या.

सिद्धिविनायक मंदिर, जैन मंदिर व बुऱ्हानी बालवाडी येथील कचराकुंडीतील कचरा उचलण्याचे काम सकाळी व रात्री अशा दोन सत्रांमध्ये करावे.
*
(जसंवि/१९८)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here