मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (MIFF) २०२६ च्या निमित्ताने महाराष्ट्र शासन, सांस्कृतिक कार्य विभागाच्या दादासाहेब फाळके चित्रनगरीच्या वतीने मराठी भाषेतील निवडक १९ लघुपट आणि माहितीपटांचा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. १६ जून २०२६ रोजी, सायंकाळी ६.३० वाजता या महोत्सवाचे उद्घाटन पु. ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या लघु नाट्यगृहात होणार आहे.
दिनांक १६ ते २० जून दरम्यान पु. ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या लघु नाट्यगृहात नियमित संध्याकाळी ६.३० वाजता महोत्सव रंगणार आहे. केवळ १९ जून रोजी ४ ते ६ वाजेपर्यंत प्रदर्शन करण्यात येणार आहे.
राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार, सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ.किरण कुलकर्णी आणि महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
माहितीपट व लघुपट वेळापत्रक खालील प्रमाणे : –
*मंगळवार, १६ जून २०२६*
१. मायबाचे आशिर्वाद- लघुपट
दिग्दर्शक: अपूर्वा बर्दापूरकर
वेळ: २० मिनिटे
१. मेतकूट – लघुपट
दिग्दर्शक: दिग्दर्शक: आनंद तांबोळी, दीप्ती मडी
वेळ: ३० मिनिटे
१. नेहमीच – लघुपट
दिग्दर्शक: युधाजित बसू
वेळ: २८ मिनिटे
१. फड- माहितीपट
दिग्दर्शक: धनंजय यमुना अहिराणी
वेळ: ३०मिनिटे १० सेकंद
*बुधवार, १७ जून २०२६*
१. वेणी – लघुपट
दिग्दर्शक: विशाल जेजुरकर
वेळ: २३ मिनिटे
१. जास्वंद- लघुपट
दिग्दर्शक: शोनील यल्लत्त्तीकर
वेळ: १३ मिनिटे ५० सेकंद
१. पॅम्पलेट- लघुपट
दिग्दर्शक: शेखर बापू रणखंबे
वेळ: २९ मिनिटे ४१ सेकंद
१. महाल्ले- माहितीपट
दिग्दर्शक: अक्षय प्रदीप इंगळे
वेळ: २० मिनिटे
१. अर्जुन- लघुपट
दिग्दर्शक: शिवराज वायचळ
वेळ: १४ मिनिटे ४५ सेकंद
*गुरुवार, १८ जून २०२६*
१. ब्रह्मकमळ- लघुपट
दिग्दर्शक: आशुतोष पोपट जरे
वेळ: २२ मिनिटे
१. गढूळ- लघुपट
दिग्दर्शक: गणेश शेलार
वेळ: २५ मिनिटे २४ सेकंद
१. डीयर २०२- लघुपट
दिग्दर्शक: अनिकेत काळे
वेळ: २३ मिनिटे
१. १७ वे वर्ष- लघुपट
दिग्दर्शक: निलेश अरुण कुंजीर
वेळ: २४ मिनिटे ५९ सेकंद
१. फड- माहितीपट
दिग्दर्शक: धनंजय यमुना अहिराणी
वेळ: ३० मिनिटे १० सेकंद
*शुक्रवार, १९ जून २०२६*
१. पाणखोल- लघुपट
दिग्दर्शक: पराग प्रदीप
वेळ: २६ मिनिटे
१. अर्जुन- लघुपट
दिग्दर्शक: शिवराज वायचळ
वेळ: १४ मिनिटे ४५ सेकंद
१. डोंगर पाणी- लघुपट
दिग्दर्शक: संजीवनी कांबळे
वेळ: २४ मिनिटे ५२ सेकंद
१. दारवठा‐लघुपट
दिग्दर्शक: निशांत रॉय बोम्बार्डे
वेळ: ३० मिनिटे
*शनिवार, २० जून २०२६*
१. वाघ- लघुपट
दिग्दर्शक: मुक्ती कृष्ण
वेळ: १९ मिनिटे ५९ सेकंद
१. सापशिडी- लघुपट
दिग्दर्शक: मयुरा डोळस
वेळ: २९ मिनिटे १८ सेकंद
१. मुक्ता- लघुपट
दिग्दर्शक: आनंद तांबोळी, दीप्ती माडी
वेळ: ३१ मिनिटे
१. दारवठा- लघुपट
दिग्दर्शक: निशांत रॉय बोम्बार्डे
वेळ: ३० मिनिटे


















