*कामगार किमान वेतन हक्क समितीच्या संघर्षाला यश.*
*————————–*
*सोलापूर ११
*सोलापूरसह राज्यातील सर्व विडी कामगार महिलांना किमान वेतन लवकर जाहीर करणार अशी घोषणा महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री ना.आकाश फुंडकर साहेब यांनी जाहीर केले आहे. यावरून विडी कामगार किमान वेतन व संघर्ष समितीने गेल्या ७ ते ८ वर्षापासून महिला विडी कामगारांना किमान वेतनाची अंमलबजावणी करण्यासाठी *१) विडी कामगार सेना (उबाठा), २) राष्ट्रवादी कामगार सेल (शरद पवार), ३) नव महाराष्ट्र कामगार सेना (शिंदे गट), ४) राष्ट्रीय वेडी मजदूर संघ (इंटक)*
*या कामगार संघटनेने एकत्र देऊन शासन दरबार वारंवार विविध आंदोलनाद्वारे मान्य कामगार मंत्रीपासून सर्व वरिष्ठ व जिल्हा पातळीवरील शासकीय अधिकारी यांच्याकडे यशस्वी प्रयत्न केला. त्यामुळे कामगार मंत्री यांनी मंत्रालयात त्यांच्या अध्यक्षतेखाली व वरिष्ठ शासकीय अधिकारी कामगार प्रतिनिधी आणि मालक प्रतिनिधी यांची बैठक दिनांक – ६/५/२०२६, २०/५/२०२६ आणि २/६/२०२६ असे सलग तीन बैठका लावून तिने बाजूच्या प्रतिनिधींना मत मांडण्याचे मुभा दिले. परंतु मालक वर्गाने उद्योगाला परवडत नाही हे कारण पुढे करून किमान वेतन अंमलबजावणीस नकार दिला. तर किमान वेतन हक्क समिती बिडी कामगारांना गेल्या अनेक वर्षापासून किमान वेतनापासून वंचित आहेत. त्यांना जास्तीत जास्त मजुरी मिळवून द्यावे अशी मागणी करीत मा. कामगार मंत्र्यांना पुर्ण अधिकार दिला त्यावरून कामगार मंत्री महोदयांनी दिनांक – २/६/२०२६ च्या बैठकीत मालक व कामगार प्रतिनिधींना अहवाल पाठवण्याचे आदेश जाहीर केले त्यानुसार बिडी कामगार किमान वेतन हक्क समितीचे *१) विडी कामगार सेना (उबाठा), २) राष्ट्रवादी कामगार सेल (शरद पवार), ३) नव महाराष्ट्र कामगार सेना (शिंदे गट), ४) राष्ट्रीय वेडी मजदूर संघ (इंटक)* *यांनी आपापले अहवाल मान्य कामगार मंत्री महाराष्ट्र राज्य यांना पाठविले आहे. या अहवालात ३५०रुपये ४०० रुपये किमान वेतन जाहीर करावे असे विनंती केली आहे या अहवालात व प्रसिद्धी पत्रकात *१) विडी कामगार सेना ( शिवसेना ठाकरे गट), अध्यक्ष – विष्णु कारमपुरी (महाराज), २) राष्ट्रवादी कामगार सेल (शरद पवार) गोवर्धन सुंचु, 3) नव महाराष्ट्र कामगार सेना (शिंदे गट) सायबण्णा तेग्गेळी, ४) राष्ट्रीय वेडी मजदूर संघ (इंटक) – राहूल गुजर* *यांच्या सह्या आहेत*.
*————————————–*
*फोटो मॅटर :- बिडी कामगार किमान वेतन अंमलबजावणीसाठी मुंबई येथील कामगार आयुक्त कार्यालय झालेल्या बैठकीत प्रसंगी कामगार मंत्री समवेत विष्णू कारमपुरी (महाराज), डॉ. गोवर्धन सुंचू, सायबण्णा तेग्गेळी, रेखा आडकी दिसत आहेत.*
Home सातारा / सांगली / सोलापूर / कोल्हापूर *विडी कामगारांना कामगार मंत्री लवकरच किमान वेतन जाहीर करणार* –


















