Home मुंबई *पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दीर्घायुष्यासाठी* *श्री पुष्टीपती गणेश मंदिरात महाआरती*

*पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दीर्घायुष्यासाठी* *श्री पुष्टीपती गणेश मंदिरात महाआरती*

17
0

मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतंत्र भारताच्या इतिहासात सर्वाधिक काळ सलग पंतप्रधानपद भूषविण्याचा ऐतिहासिक विक्रम प्रस्थापित केल्याच्या पार्श्वभूमीवर बुधवारी मागाठाणे विधानसभेतर्फे श्री पुष्टीपती गणेश मंदिरात महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दीर्घायुष्य, उज्ज्वल भवितव्य आणि उत्तम आरोग्यासाठी आज भाजपा गटनेते आमदार प्रवीण दरेकर यांच्या उपस्थितीत बोरिवली (पूर्व) च्या ओधव नगर येथील श्री पुष्टीपती गणेश मंदिरात महाआरती करण्यात आली. यावेळी प्रभाग समिती अध्यक्ष प्रकाश दरेकर, मागाठाणे विधानसभा संयोजक कृष्णकांत दरेकर, मंडळ अध्यक्ष अमित उतेकर, मंडळ अध्यक्षा सोनाली नखुरे उत्तर मंडळाचे महामंत्री सागर पवार, संतोष जाधव, संजय घाडी, मध्य मंडळाचे महामंत्री संजय मोरे, राकेश घाडगे, स्वप्नील देसाई, महिला मोर्चा अध्यक्षा प्रियांका रेडकर, मेघा चाफेकर, युवा मोर्चा अध्यक्ष विनायक राजेशिर्के, सुमित घाग, निकेश तळेकर, संदीप तोत्रे, वैशाली कावा, सुरज नावडकर, मृदुला पवार, दीपेश वर्तक, पूजा जोशी, गणेश ताटे, कल्पेश वाळके यांसह मोठ्या संख्येने परिसरातील नागरिक उपस्थित होते.

यावेळी उपस्थितांना संबोधित करताना आ. दरेकर म्हणाले कि, बारा वर्ष कुठल्याही प्रकारची विश्रांती न घेता ज्या देशवासियांनी माझ्यावर विश्वास टाकला त्या देशवासियांसाठी अपार कष्ट गेली १२ वर्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी घेताहेत. आपल्या आयुष्यातील एकही क्षण त्यांनी वाया घालवला नाही. आज आपल्या देशाला जागतिक स्तरावर एका उंचीवर नेण्याचे कामं त्यांनी केले. देशातील सर्व समाजघटकांना समान न्याय देण्याचा प्रयत्न केला. जनतेसाठी अनेक योजना आणल्या. शिक्षणात स्वतः पालकांच्या भूमिकेतून पंतप्रधान मोदी लक्ष घालत होते. हे करत असताना अनेक संकटे देशावर आली. देशावर आक्रमण झाली ती ताकदीने परतवून लावली आणि पुन्हा एकदा भारताचे सामर्थ्य जगाला दाखवून दिले. कोविडसारख्या संकटात देश सावरलाच पण जगाला मदत करण्याचे कामंही केले. अशावेळी असा नेता काही वर्षांनी भेटत असतो, नियती आपल्याला देत असते. त्या नेत्याला उदंड आयुष्य मिळावे, अशी भावना देशवासियांच्या मनात येत असते. आज संपूर्ण देशात अनेक सामाजिक संघटना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उदंड आयुष्य मिळावे, आणखी काही वर्ष त्यांच्या हातून देशाची सेवा व्हावी, अशी प्रार्थना करत आहेत. तसेच पंतप्रधान मोदींच्या हातून आणखी १०-१५ वर्ष देशाची सेवा घडो. आपल्या देव-दैवतांचे आशीर्वाद मोदींच्या पाठीशी असतील, असा विश्वास यावेळी दरेकरांनी व्यक्त केला.

00000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here