*सोलापूर दिनांक :- 10/6/2026 :-*महाराष्ट्र शासनाने सोलापूर सहाय्यक कामगार आयुक्तपदी कायमस्वरूपी नियुक्ती केल्याबद्दल श्री मंगेश झोले यांचे बांधकाम कामगार क्षेत्रातील सर्व कामगार संघटनेचे वतीने त्यांचे स्वागत व सत्कार करण्यात आले. सदर प्रसंगी नूतन सहा. कामगार आयुक्त.श्री. मंगेश झोले यांनी सत्कार प्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना बांधकाम कामगारांचे सर्व योजना सहज व सुलभ पोहोच विण्याचा प्रयत्न करणार असे प्रतिपादन केले*.
*सोलापूर सहाय्यक कामगार आयुक्त हे पद गेल्या काही कालावधीपासून रिक्त असून या पदावर कायमस्वरूपी अधिकाराची नियुक्ती करावी अशी मागणी सर्व कामगार संघटनेचे वतीने शासनाकडे वारंवार करण्यात आली होती. त्यानुसार गेल्या काही महिन्यापासून प्रभारी असलेले सहाय्यक कामगार आयुक्त श्री मंगेश झोले यांची महाराष्ट्र शासनाने कायमस्वरूपी नियुक्ती केली आहे या पित्यर्थ बांधकाम कामगार क्षेत्रात सर्व कामगार संघटनेने संयुक्तपणे श्री.मंगेश झोले यांचा मानाचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केले*.
*सदर प्रसंगी महाराष्ट्र कामगार सेनेचे विष्णू कारमपुरी (महाराज), बांधकाम कामगार संघर्ष समितीचे – सोहेल शेख, संघर्ष कामगार संघटनेचे – अंगद जाधव, बालाजी चराटे, विठ्ठल कुऱ्हाडकर, कबीर तांडूरे,संदीप धोत्रे, रेखा आडकी, गुरुनाथ कोळी, श्रीनिवास बोगा, भारत देवकुळे, यांच्यासह कामगार बंधू-भगिनी उपस्थित होते*.
*—————————————*
*फोटो मॅटर – सोलापूर जिल्हा सहा. आयुक्त पदी श्री. मंगेश झोले यांची कायम स्वरूपी नियुक्ती झाल्याबद्दल बांधकाम क्षेत्रातील सर्व कामगार संघटनेच्या वतीने स्वागत व सत्कार करतांना. विष्णु कारमपुरी (महाराज), सोहेल शेख, बालाजी चराटे, कबीर तांडूरे, यांच्यासह कामगार बंधू – भगिनी उपस्थित होते.*
Home सातारा / सांगली / सोलापूर / कोल्हापूर *बांधकाम कामगारां पर्यंत सर्व योजना सहज व सुलभ पोहोचवण्याचा प्रयत्न करणार :-...















