Home आरोग्य / पर्यावरण संवेदनशीलतेचा गर्भपात: शिवनीती विसरलेलं सत्ताकारण” _✍️ शीतल करदेकर / माईमीडिया24

संवेदनशीलतेचा गर्भपात: शिवनीती विसरलेलं सत्ताकारण” _✍️ शीतल करदेकर / माईमीडिया24

6
0

 

“संवेदनशीलतेचा गर्भपात: शिवनीती विसरलेलं सत्ताकारण”

_✍️ शीतल करदेकर / माईमीडिया24

🔴 ‘माईमीडिया24’ विशेष 🔴

शिवराज्याभिषेक दिन साजरा झाला. भगवे झेंडे फडकले. ‘जय शिवराय’ च्या घोषणा दुमदुमल्या. अभिमान आहे.

पण सण संपला. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी शेतकऱ्याच्या दारात तेच ‘तिहेरी संकट’ –
१. ‘आस्मानी’: रावेर-यावल मध्ये गारपिटीने केळी बागा १००% भुईसपाट. एकरी ५ लाखांचं नुकसान.
३. ‘व्यवस्थेचा जुलूम’: कांद्याला खर्च १८०० ₹, सरकारचा दर १२०० ₹. म्हणजे प्रति किलो ६ ₹ तोटा. जामनेर मध्ये ‘बोगस कापूस बियाणं’ जप्त झालं
३. ‘माणुसकीचा दुष्काळ’: दूरवरून पाणी भरणारी ताई. ५ किमी पायपीट करते. डोक्यावर हंडा. पोटात ७ महिन्याचा जीव. उन्हात ‘गर्भपात’ होतो.
मग सवाल पडतो की आपण ‘शिवराज्याभिषेक’ साजरा केला की ‘शिवरायांची विचारांची थट्टा’ केली?
कारण ‘शिवनीती’ सांगते – “राज्य रयतेसाठी असते. शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला हात लावू नका. जो रयतेला त्रास देईल, त्याला चौरंगा करा.” आणि संत तुकाराम सांगतात – “वृक्षवल्लीं आम्हां सोयरीं वनचरें”.

आजची ‘रयत’ म्हणजे जनता सुखी आहे का? ‘निसर्ग’ सुरक्षित आहे का?
‘ताई’ चा गर्भपात झाला – ही ‘घटना’ आहे. पण त्यामागे ‘व्यवस्थेच्या संवेदनशीलतेचा गर्भपात’ झालाय . हे ‘कारण’ आहे नव्हे वास्तव आहे.

सरकार ‘इव्हेंट’ मधे नाही तर, ‘सत्ताकारणात’ व्यस्त आहे.
‘इव्हेंट’ दिसतो. ‘हार-तुरे’ दिसतात. ‘सत्ताकारण’ दिसत नाही. ते आतल्या आत चालतं. खुर्ची वाचवण्याचं गणित मांडलं जातं.

सत्ताकारण’ म्हणजे काय?
म्हणत असतील तरच
१. ‘ताई’ पाण्याविना मरते, पण ‘जल जीवन मिशन’ चे पैसे ‘कोणत्या ठेकेदाराला’ द्यायचे याचं गणित महत्वाचं.
२. कांद्याला९₹ दिले तर ‘शहरात महागाई’ वाढेल, ‘मतं’ जातील – ही भीती महत्वाची.
३ बोगस बियाण्याच्या ‘मालका’वर का⁰रवाई केली तर ‘त्याची व्होट बँक’ जाईल – ही ‘सोय’ महत्वाची._
_4. केळीला पूर्ण मदत दिली तर ‘उद्योगपतींची कर्जमाफी’ कशी करणार – हा ‘मेवा’ महत्वाचा._
५. ‘जंगलतोड’ करून ‘प्रकल्प’ आणला तर ‘कमिशन’ मिळेल – हा ‘विकास’ महत्वाचा.
म्हणजे ‘रयत मेली, निसर्ग उद्ध्वस्त झाला तरी चालेल, सत्ता टिकली पाहिजे’ हेच आजचं ‘सत्ताकारण’.
बाळासाहेब ठाकरे म्हणायचे “सत्ता म्हणजे ‘सेवा’ असते, ‘मेवा’ नाही. शेतकऱ्याच्या टाहो ऐकू येत नसेल, तर सत्ता ‘बहिरी’ झाली समजा.”
आज सत्ता ‘बहिरी’ नाही, ‘मुर्दाड’ झाली आहे. कारण ‘बहिऱ्याला’ ओरडून ऐकवता येतं. ‘मुर्दाड’ यंत्रणेला ‘जाब’ विचारावा लागतो.
मग ‘शिवराय असते तर काय केले असते?’ – याचं उत्तर ‘शिवनीती’ देते. आणि त्यानुसार ‘माईमीडिया24’ ची सरकारला ५ कलमी ‘तंबी’ आहे:

१. ‘पंचनामा नको, पंच द्या’: ड्रोन सर्व्हे ने ४८ तासात नुकसान ठरवा.कर्ज माफी जी आरची ‘२ लाखाची मर्यादा’ रद्द करा. हेक्टरी ३ लाख सरसकट द्या. ८ दिवसात पैसे खात्यात जमा करा. हयगय करणारा अधिकारी ‘निलंबित’ करावा

२. ‘भाव द्या, भीक नको’: कांद्याला ‘C२+५०% = २५०० ₹’ चा स्वामिनाथन दर द्या. २००० ₹ च्या खाली खरेदी बंद. निर्यातबंदी हटवा._
३. ‘लुटारूंचा चौरंगा करा’: बोगस बियाणं प्रकरणाा- मालक, अधिकारी, पाठीराखे सर्वांना अटक करा. फास्ट ट्रॅक कोर्टात २ महिन्यात ‘७ वर्ष सक्तमजुरी + मालमत्ता जप्त’ करा.

४ ‘७/१२ कोरा करा’: आस्मानी संकटग्रस्त सर्व जिल्ह्यांची सरसकट कर्जमाफी करा. नवीन पीक कर्ज ०% व्याजाने ताबडतोब द्या.

५. ‘पाणी द्या, ताई वाचवा’: दुष्काळी ५०० गावात रोज २ वेळा टँकर सक्तीचा. GPS मॉनिटरिंग. गरोदर महिलांना ‘घरपोच पाणी’. गर्भपात झाला तर ‘जिल्हाधिकारी यांना’ जबाबदार धरुन थेट निलंबन करावे.

‘शिवजयंती’ ला १०कोटी ‘उत्सवावर’ खर्च करता? त्या पैशात १०० गावात ‘नळ योजना’ पूर्ण होते. हजारो ताईंचे ‘गर्भ’ वाचतात. १० हजार ‘झाडं’ लागतात. ‘उत्सव’ करा, पण ‘आधी जीव’ वाचवा.

माईमीडिया24′ चा इशारा स्पष्ट आहे:_
‘इव्हेंट’ करून जनतेला भुुलवता येते. ‘सत्ताकारण’ करताना जनतेला मरायला सोडता येते. पण ‘जनता’ जेव्हा जागी होते, तेव्हा ‘सत्ता’ उलथवून टाकते.

‘संवेदनशीलतेचा गर्भपात’ सत्ताकारणाच्या पोटी झाला आहे.
हा ‘गर्भपात’ थांबवायचा असेल, तर ‘सत्ते’ ला जाब विचारावा लागेल . अशी ‘खुर्ची’ हलवावी लागेल.

कारण ‘शिवराज्याभिषेक’ म्हणजे ‘राजाचा’ दिवस नाही, ‘रयतेच्या राज्या’चा दिवस आहे.
आणि *’माणूस-जीव जगन हं, पाळीव प्राणी-जंगल-निसर्ग ही सन्मानाने जगावा’* हेच शिवरायांचं स्वप्न होतं. आहे. आणि राहील.

……

तुमच्या गावात ‘ताई’ किती लांब पाणी भरते? ‘बाजार समितीत’ दर किती? ‘जंगलतोड’ कुठे सुरू आहे? VIDEO पाठवा – ‘माई मीडिया 24’ 9821209870_

_✍️ शीतल करदेकर -माईमीडिया24

#संवेदनशीलतेचा_गर्भपात #शिवनीती_आणा #माणूस_जीव_जगन_हं #निसर्ग_सन्मानाने_जगावा #2000_दर_द्या #पाणी_वाचवा_ताई_वाचवा #बोगस_बियाणे_बंद #MaiMedia24 #गरज_असेल_तेव्हाच #सत्ताकारण_थांबवा_सेवा_सुरू_करा

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here