मुंबई/पुणे :
यशवंतराव चव्हाण सेंटर, महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र आणि भारती विद्यापीठाच्या कॉलेज ऑफ आर्किटेक्चर, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “सॉल्वथॉन २०२५-२६ : इनोव्हेट फॉर दिव्यांगजन” या राज्यस्तरीय स्पर्धेच्या अंतिम निवड प्रक्रियेला उत्साहपूर्ण वातावरणात सुरुवात झाली.
या प्रसंगी मा. यशवंत शितोळे, मा. कविता मुरुगकर, मा. केतन कोठारी, मा. पारुल कुमठा तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी स्पर्धकांना शुभेच्छा देत दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान, संशोधन आणि सामाजिकदृष्ट्या उपयुक्त कल्पनांची आवश्यकता अधोरेखित केली.
अंतिम फेरीमध्ये विविध संघांनी दिव्यांग व्यक्तींच्या दैनंदिन जीवनातील अडचणींवर प्रभावी उपाय सुचविणारे अभिनव प्रकल्प सादर केले. त्यामध्ये मानव गट, पुणे यांचा ब्लाइंड तिकीट सिस्टीम, विजनर्स गट, नाशिक यांची स्मार्ट ब्लाइंड स्टिक, प्रयास गट, पालघर यांचे दिव्यांग व्यक्तींसाठी रोजगार उपलब्धता व संधी निर्माण करणारे व्यासपीठ, वी कॅन गट, आंध्रप्रदेश यांचे स्वसंरक्षणासाठी डिव्हाईस, फार्मासिस्ट गट, नाशिक यांचे औषध सेवनासाठी स्मरणयंत्र, त्रिनेत्रा गट, पुणे यांचे नाडी तपासणी यंत्र तसेच GOM गट, नाशिक यांचे हेल्थ केअर अॅप – QRX Info या प्रकल्पांचा समावेश होता.
या अभिनव संकल्पनांमध्ये दिव्यांग व्यक्तींच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडवून आणण्याची क्षमता असून, सर्व सहभागी संघांनी आपल्या प्रकल्पांचे प्रभावी सादरीकरण केले. अशा उपक्रमांमुळे दिव्यांगजनांसाठी अधिक समावेशक, सुलभ आणि तंत्रज्ञानाधारित समाजनिर्मितीला चालना मिळणार असल्याचा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी यशवंतराव चव्हाण सेंटर विभागाचे संयोजक मा. विजय कान्हेकर, विभाग प्रमुख दिपीका शेरखाने, समन्वयक मनिषा खिल्लारे तसेच राहील शेख, सूत्रसंचालक हेजल न्यायनीत, समृद्धी पुजारी, शिवम जाधव आणि संकेत जांभळे यांनी विशेष परिश्रम घेतले.
या अंतिम निवड प्रक्रियेतून पहिले तीन गटांना प्रथम, द्वितीय आणि तृतीय करमाकांची पारितोषिक जाहीर झाली अहेत. त्याचा हा पुरस्कार प्रदान सोहळा पुढे लाही दिवसातच स्वतंत्र घेण्यात येईल.
विजेते तीनही मान्यवर गटाचे अभिनंदन





















