१६ मे २०२६ रोजी सायंकाळी कान्स फिल्म फेस्टिव्हलमधील भारत पॅव्हेलियन येथे आयोजित अभिजात मराठी च्या जागतिक लाँच कार्यक्रमानंतर मान्यवर, चित्रपटसृष्टीतील व्यक्तिमत्त्वे, निर्माते, सांस्कृतिक प्रतिनिधी आणि आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत उच्चस्तरीय नेटवर्किंग रात्रभोजनाचे आयोजन करण्यात आले.
या जागतिक लाँचला अशोक सराफ, निवेदिता सराफ, प्राजक्ता माळी, अंकिता वालावलकर, जयंती वाघधरे आणि अभिजात मराठी ओटिटी चे संस्थापक केदार जोशी उपस्थित होते.
अभिजात मराठीचे अधिकृत रेड कार्पेट प्रतिनिधित्व अशोक सराफ यांच्या नेतृत्वाखाली होणार असून मराठी सिनेमा, संस्कृती आणि डिजिटल कथाकथनाचे जागतिक स्तरावर प्रतिनिधित्व करण्यात येणार आहे.
मराठी आणि प्रादेशिक कंटेंटची वाढती जागतिक ओळख, प्रादेशिक कथाकथनाचा प्रभाव आणि भारतीय प्रादेशिक सिनेमा व डिजिटल मनोरंजनासाठी निर्माण होत असलेल्या नव्या संधींवर विशेष पॅनेल चर्चेचे आयोजन करण्यात येणार आहे.
अभिजात मराठी हे केवळ मराठी ओटिटि प्लॅटफॉर्म नसून मराठी सिनेमा, भक्ती, लाईफस्टाईल, इन्फोटेन्मेंट आणि ए आय -आधारित नव्या कथाकथनाचे डिजिटल विश्व आहे.
अभिजात मराठीची प्रेरणा २०२४ मध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्यानंतर निर्माण झाली. हा क्षण जगभरातील मराठी भाषिकांसाठी सांस्कृतिक अभिमानाचा ठरला.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठी भाषेच्या अभिजात दर्जासाठी केलेला सातत्यपूर्ण पाठपुरावा अत्यंत महत्त्वाचा ठरला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही दृष्टी अधिक व्यापक आणि जागतिक स्तरावर पुढे नेत महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्राला नवे बळ दिले आहे.
मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी निर्माण केलेले नाविन्यपूर्ण आणि प्रोत्साहनात्मक वातावरण हे या चळवळीचे महत्त्वाचे आधारस्तंभ ठरले आहे. मराठी भाषा, साहित्य, सिनेमा आणि डिजिटल कथाकथन जागतिक स्तरावर पोहोचविण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.
Home नाटक / चित्रपट / मालिका / समीक्षा भारत पॅव्हेलियन येथे अभिजात मराठी ओटिटी चे जागतिक लाँच – कान्स फिल्म...





















