Home पुणे *राज्य सहकारी संघामार्फत शिक्षण-प्रशिक्षण वाढविण्यावर भर देणार*

*राज्य सहकारी संघामार्फत शिक्षण-प्रशिक्षण वाढविण्यावर भर देणार*

28
0

*संघाचे अध्यक्ष आ. प्रवीण दरेकरांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत चर्चा*

पुणे – आज महाराष्ट्र राज्य सहकारी संघाचे अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत राज्यातील ३३ सहकारी बोर्डाच्या प्रतिनिधीची सहकारी संघाच्या पुणे येथील कार्यालयात बैठक पार पडली. या बैठकीत जिल्हा सहकारी बोर्डाच्या अडीअडचणी सोडविण्यासह राज्य सहकारी संघामार्फत शिक्षण-प्रशिक्षण वाढविण्याचे कामं करण्यावर भर देण्यात आला.

यावेळी राज्य सहकारी संघाचे मानद सचिव रामदास मोरे, उपाध्यक्ष अर्जुनराव बोरुडे, मुख्य कार्यकारी अधिकारी सोनाली रावल-ठाकूर यांसह ३३ सहकारी बोर्डाचे अध्यक्ष व जिल्हा विकास अधिकारी उपस्थित होते.

यावेळी बैठकीत महाराष्ट्र राज्य सहकारी संघाला उर्जितावस्था आणण्यासह संघामार्फत शिक्षण-प्रशिक्षण वाढविण्यावर भर, कर्मचाऱ्यांचे वेतन देण्यासह इतर बाबींवर सविस्तर उहापोह करण्यात आला. त्याचबरोबर सहकार चळवळीचे मुखपत्र ‘सहकारी महाराष्ट्र’ राज्यभर वितरित करण्याचा निर्णयही घेण्यात आला. सहकारी महाराष्ट्र या मुखपत्रात गृहनिर्माण संस्थांच्या अडचणी, लेख, सहकाराशी निगडित सदरे प्रकाशित करण्याबाबतही बैठकीत चर्चा करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here