Home मुंबई *महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या दादासाहेब फाळके चित्रपट रसास्वाद मंडळ...

*महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या दादासाहेब फाळके चित्रपट रसास्वाद मंडळ उपक्रमांतर्गत* ; *आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात नावाजलेल्या जीव चित्रपटाचे प्रदर्शन;*

24
0

*अद्याप प्रदर्शित न झालेला नवाकोरा चित्रपट पाहण्याची सिनेप्रेमींना संधी*

मुंबई
कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव चित्रपट बाजार विभाग, पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव यासारख्या नावाजलेल्या चित्रपट महोत्सवात मोहोर उमटवलेल्या ‘जीव’ या मराठी चित्रपटाचे प्रेक्षकांसाठी पहिल्यांदाच प्रदर्शन होणार आहे.

महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या दादासाहेब फाळके चित्रपट रसास्वाद मंडळ उपक्रमांतर्गत या चित्रपटाचे प्रदर्शन मंगळवार, २६ मे २०२६ रोजी सायंकाळी ७ वाजता मुंबईतील प्रभादेवी येथील पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, लघु नाट्यगृह, तिसरा मजला येथे होणार आहे.

‘जीव’ या मराठी चित्रपटाचे दिग्दर्शन रवींद्र जाधव यांनी केले असून शिवाजी शेवाळे, बेबीताई सूर्यवंशी, किरण काकडे, दीक्षा उजागरे, आदर्श जाधव, समीर रामटेके, रवींद्र जाधव, उषा निंबाळकर आदी कलाकारांनी महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.

‘जीव’ चित्रपटाची कथा नेमकी काय आहे?

‘जीव – The Creature हा एक मराठीतील महत्त्वपूर्ण आणि आशयघन चित्रपट आहे. दिग्दर्शक रवींद्र जाधव यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटाने ग्रामीण आणि आदिवासी जीवनातील श्रद्धा, परंपरा आणि मानवी संघर्ष यांचे अत्यंत संवेदनशील चित्रण केले आहे.

कोकणातील आदिवासी समाजाच्या पार्श्वभूमीवर घडणारी ही कथा मृत्यूनंतर ‘जीव’ पुन्हा कुटुंबात परत येण्याच्या पारंपरिक समजुतीभोवती फिरते. परंपरा, सामाजिक दबाव आणि अस्तित्वासाठीचा संघर्ष यामध्ये अडकलेल्या एका कुटुंबाची भावनिक आणि अंतर्मुख करणारी कहाणी हा चित्रपट मांडतो.

अद्याप प्रदर्शित न झालेला नवाकोरा ‘ जीव’ हा चित्रपट पाहण्याची संधी सिनेप्रेमींना मिळणार असून यासाठी आवर्जून उपस्थित रहावे, असे आवाहन महामंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. या वेळी दिग्दर्शक आणि इतर कलाकार यांचेशी संवाद साधला जाणार आहे.
प्रवेशासाठी सभासदांनी
२१ मे पर्यंत पूर्व नावनोंदणी करणे अनिवार्य आहे.
आसने शिल्लक असल्यास सभासद नसणाऱ्या रसिकांना आसने उपलब्ध करुन देण्यात येतील.
सभासद नोंदणी कार्यक्रम स्थळी करता येईल.तसेच आसन आरक्षित करणे व अधिक माहितीसाठी सुमेध- 8652215401, पंकज – 9702270821.
संपर्काचे आवाहन करण्यात आले आहे.
***
…………

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here