Home मुंबई *बहिणाबाई चौधरी यांच्या कविता जागविणार कांचन सावंत ;

*बहिणाबाई चौधरी यांच्या कविता जागविणार कांचन सावंत ;

33
0

डोंबिवलीत रविवारी ‘माझी माय सरसोती’ कार्यक्रमाचे आयोजन

मुंबई
खानदेशातील ख्यातनाम कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या रचनांवर आधारित ‘माझी माय सरसोती’ हा सुरेल बहारदार गीतांचा कार्यक्रम आहे. रविवार, १७ मे २०२६ रोजी सायंकाळी साडेसहा वाजता शुभमंगल सभागृह, भाजी मंडई, डोंबिवली पूर्व येथे कुळकर्णी बंधूंनी या ‘माझी माय सरसोती’ या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. गायिका कांचन सावंत असून गीतांना स्वरसाज चढविला आहे प्रख्यात संगीत संयोजक उदय चितळे यांनी. दिनेश अडावदकर हे सुसंवाद साधणार असून प्रमोद थोरे, मकरंद विष्णुपुरीकर, व्यंकटेश कुलकर्णी हे साथसंगत करणार आहेत. हा कार्यक्रम विनामूल्य असून इच्छुकांनी श्रीरंग कुळकर्णी यांच्या समवेत ९८२००९७५३३ या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here