सोलापूर
महिला विडी कामगारांना लवकरच केंद्र शासनाने जाहीर केलेल्या किमान वेतनाची अंमलबजावणी करणार असल्याची ग्वाही मुंबई येथील विडी कामगार किमान वेतन अंमलबजावणी बाबत बोलविण्यात आलेल्या शासन, प्रशासन, कामगार प्रतिनिधी व मालक प्रतिनिधी यांच्या आयोजित केलेल्या बैठकीत महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री आकाश पुंडकर यांनी दिली असल्याची माहिती महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रदेश सरचिटणीस विष्णू कारमपुरी (महाराज) यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली .
सोलापूरसह महाराष्ट्रातील विडी वळणाऱ्या महिला कामगारांना किमान वेतनाची अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी महाराष्ट्र कामगार सेनेसह राज्यातील सर्व कामगार संघटनेने केली याबाबत गेल्या दोन वर्षापासून कामगार मंत्रालयाकडून अनेक वेळा बैठका आयोजित करण्यात आली परंतु बहुतेक बैठकांना विडी मालक उपस्थित राहिले नाहीत.
प्रत्येक वेळी कामगार संघटनेच्या प्रतिनिधींचे बाजू कामगार मंत्र्यांनी ऐकून घेतले त्याच धर्तीवर ६मे २०२६रोजी कामगार मंत्री महोदयांनी संयुक्त बैठक बोलावली. या बैठकीत कामगार संघटना प्रतिनिधींची व मालक संघटना प्रतिनिधींची बाजू ऐकून घेऊन कामगार मंत्री आकाश फुंडकर साहेबांनी लवकरच महिला विडी कामगारांसाठी केंद्राच्या जाहीर केलेल्या किमान वेतनाची अंमलबजावणी करण्यात येईल.अशी ग्वाही दिली.
कामगार मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत कामगार आयुक्त, कामगार सचिव, अप्पर कामगार आयुक्त पुणे, सहाय्यक कामगार आयुक्त सोलापूर, माजी आमदार नरसय्या आडम (मास्तर) व सिटी संघटनेचे प्रतिनिधी, महाराष्ट्र कामगार सेनेचे पप्पू शेख, गुरुनाथ कोळी, मालक संघटनेचे बाळासाहेब जगदाळे यांच्यासह पुणे, मुंबई व इतर जिल्ह्यातील कामगार संघटनेचे यांच्या उपस्थित होते.
या वेळी महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने विडी कामगारांना किमान वेतनाची अंमलबजावणी त्वरित करण्यात यावी.” अशा मागणीची निवेदन मान्य कामगार मंत्री फुंडकर यांना देण्यात आले.
***
छायाचित्र मजकूर: विडी कामगारांना त्वरित किमान वेतनाची अंमलबजावणी करण्यात यावी या मागणीचे निवेदन कामगार मंत्री महोदयांना देताना. कामगार सेनेचे प्रतिनिधी – पप्पु शेख
Home सातारा / सांगली / सोलापूर / कोल्हापूर *विडी कामगारांच्या किमान वेतनाची लवकरच अंमलबजावणी करणार – कामगार मंत्री यांची





















