Home जालना / परभणी / बीड / लातूर / हिंगोली / नांदेड / उस्मानाबाद गुणरत्न सदावर्तेंच्या कारवर मनसैनिकांचा हल्ला; आधी शाईफेक, पुन्हा सुपाऱ्या फेकून मारल्या!

गुणरत्न सदावर्तेंच्या कारवर मनसैनिकांचा हल्ला; आधी शाईफेक, पुन्हा सुपाऱ्या फेकून मारल्या!

44
0

जालन्यात अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शाई आणि सुपारी फेक केली आहे. ज्या गाडीवर शाई आणि सुपारी फेकल्या त्या गाडीत गुणरत्न सदावर्ते यांची पत्नी आणि मुलगी होती. जालना शहरातल्या विशाल कॉर्नर परिसरात ही घटना घडली आहे. गुणरत्न सदावर्ते शनिवारी जालना दौऱ्यावर असताना ही घटना घडली.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जालना शहराध्यक्ष राहुल रत्नपारखे यांच्यासह अजून काही पदाधिकाऱ्यांकडून ही शाई फेक करण्यात आली आहे. मागील काही दिवसांपूर्वी मुंबईतील रिक्षा चालकांच्या संदर्भात मराठी अमराठी यावादावर गुणरत्न सदावर्ते यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यवार टीका केल्यानंतर जालन्यात मनसैनिक आक्रमक झाले होते. चंदनझिरा पोलिसांकडून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पाच जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here